घरफोडी चोरी करणारा परराज्यातील अटल गुन्हेगार जेरबंद तीन गुन्हे उघडकीस, २,२७,०००/-रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत


पंकेश जाधव मुख्य संपादक 702079462

आंबेगाव पोलीस स्टेशन पुणे शहर

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक १७/०३/२०२५ रोजी दुपारी ०३/०० ते ०६/३० वा सुमारास पहिला मजला कोंढरे बिल्डींग शिलाई वर्ल्ड जवळ आंबेगाव बु येथ घरफोडी करुन चोरी केल्याबाबत आंबेगाव पोलीस ठाणे गु.रजि क्रमांक ४८/२०२५ बी.एन.एस.३०५ (अ), ३३१ (३) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

सदर गुन्हयांत आंबेगाव पोलीस ठाण्याचे तपास पथकाने कसोशीने सी.सी.टि. फुटेजच्या आधारे गुन्हयांतील आरोपीत निष्पण करुन सदर गुन्हयात आरोपीत नामे व्यकटेंश रमेश वय-२२ वर्ष रा.पी.जी बिल्डींग, एमआयटी कॉलेज जवळ, कोथरुड पुणे मुळ राहणार बंगलोर राज्य कर्नाटक यास अटक केली आहे.
सदर आरोपीत यांच्याकडे तपास करुन खालील प्रमाणे तीन गुन्हे उघडकीस आले आहे.
आंबेगाव पोलीस ठाणे गुन्हा रजि क्रमांक ४८/२०२५ बी.एन.एस. ३०५ (अ),३३१ (३)
१) २) बावधन पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड गुन्हा रजि क्रमांक १२९/२०२५ बी.एन.एस. ३०५,३३१ (३)
३) लोणीकंद पोलीस ठाणे गुन्हा रजि क्रमांक १०९७/२०२५ बी.एन.एस.३०५,३३१ (३)

सदर आरोपी कडुन एकुण २,२७,०००/- रुपये किंमतीचे दागिने जप्त केले आहे. सदर गुन्हयांचा अधिक तपास आंबेगाव पोलीस स्टेशन तपास पथकाचे पोउनि मोहन कळमकर हे करत आहेत.

सदरची कारवाई मा. अपर पोलीस आयुकत, पश्चिम प्रादेशीक विभाग पुणे, श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ पुणे, श्रीमती स्मार्तना पाटील मा. सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे श्री. राहुल आवारे यांचे मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शरद झिने, पोलीस उप निरीक्षक मोहन कळमकर, पोलीस अंमलदार शेलेंद्र साठे, हनमंत मासाळ, चेतन गोरे, निलेश जमदाडे, धनाजी धोत्रे, प्रमोद भोसले, सुभाष मोरे, नितीन कातुर्डे, योगेश जगदाळे, समाधान कांबळे यांच्या पथकाने केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!