चोरी करणा-या सोनाराला केली अटक ४,२७,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल केला जप्त
पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626
वारजे माळवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि.२२/०३/२०२५ रोजी वर्दळीच्या ठिकाणी असणा-या वारजे माळवाडी गावठाणातील अष्टविनायक चौक रस्त्यावर फिर्यादी यांच्या दुकानात चोरी झाली होती. फिर्यादी यांनी नेहमी प्रमाणे त्यांचे दुकान उघडून त्यांचा मुलगा यांचेसह नेहमी प्रमाणे मालाची खरेदी विक्री करत होत्या. त्यांचकडे त्यांनी कमविलेले २,५७,०००/- रुपये किंमतीचे सोन्या व चांदीचे दागिणे व २,००,०००/-रुपये रोख रक्कम घरी ठेवली तर ती चोरीला जाईल म्हणून त्या रोज दुकानात आणायच्या व रोज सायंकाळी दुकानातून जाताना घरी परत घेवून जायच्या. घटनेच्या दिवशी दुकानात गर्दी झाली असताना अचानक गर्दीचा फायदा घेवून कोणीतरी फिर्यादी यांनी घरातून आणलेले ४,५७,०००/-रुपये रकमेचे सोन्या व चांदीचे दागिणे व रोख रक्कम चोरुन नेल्याचे त्यांच्या रात्रौ ०८.०० वा. चे सुमारास लक्षात आल्याने त्याबाबत वारजे माळवाडी पोलीस ठाणे येथे गु.र.नं.१२४/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०५ प्रमाणे दाखल करण्यात आला होता.
त्याबाबत वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विश्वजीत काइंगडे यांनी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक संजय नरळे यांच्या नेतृत्वात एक पथक तयार करण्यात आले. सदर पथकातील अंमलदारांनी त्यांच्या गोपणीय बातमीदारा मार्फत तसेच उत्तमनगर, वारजे, नळस्टॉप, निगडी, भोसरी, पिंपरी परिसरातील सि.सि.टी.व्ही. कॅमेरे यांची पडताळणी व तांत्रिक विश्लेषण करुन पो. अमंलदार अमित शेलार यांच्या माहिती वरुन पोलीस उप निरीक्षक नरळे, व पोलीस स्टाप यांनी वपोनि यांच्या मार्गदर्शनाखाली विनायक हॉस्पिटल समोर, अतुलनगर, वारजे, पुणे या ठिकाणी छापा टाकुन आरोपीला ताब्यात घेतले. सदरचा चोर हा व्यवसायाने स्वतःच सराफ असुन त्याने त्याच्या पत्नीसह सदरचे कृत्य केले आहे. आरोपीला अटक करुन त्याची ४ दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली. सदर आरोपी नामे संपूर्णानंद परमानंद वर्मा, वय ४३ वर्षे, रा. फ्लॅट नं.१२, बालाजी बिल्डींग, नेहरुनगर, पिंपरी याचे कडून रोख रक्कम २,००,०००/- रुपये, १७,०००/-रुपये किंमतीची २५० ग्रॅम चांदीची लगड, २,१०,०००/-रुपये किंमतीची ६७ ग्रॅम सोन्याची लगड असा एकूण ४,२७,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलीसांना यश आले असुन लवकरच न्यायालयीन प्रक्रिया पुर्ण करुन सदरचा मुद्देमाल हा फिर्यादी यांना परत करण्यात येणार आहे.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०३ पुणे शहर, श्री. संभाजी कदम, मा. सहायक पोलीस आयुक्त कोथरुड विभाग, श्री. भाऊसाहेब पटारे, यांचे मार्गदर्शनाखाली मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक वारजे माळवाडी पो. स्टे श्री. विश्वजीत काईंगडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. निलेश बडाख, यांचे देखरेखीत तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक संजय नरळे, पो. अमंलदार अर्जुन पवार, संजीव कळंबे, अमित शेलार, शरद पोळ, सागर कुंभार, बालाजी काटे, निखील तांगडे, गोविंद कपाटे, अमित जाधव, योगेश वाघ, ज्ञानेश्वर चित्ते, गणेश शिंदे यांनी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

