सोरतापवाडी फाट्यावर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू


पुणे प्रतिनिधी प्रमोद बापू सावंत 

महा पोलिस न्यूज ऑनलाइन पुणे, दि. ४ : पुणे-सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी फाटा येथे झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी उरूळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ३ एप्रिल २०२६ रोजी दुपारी सुमारे १२.३० वाजता ही घटना घडली. विक्रम दयानंद सुर्यवंशी (वय १९, रा. बोरीऐंदी, ता. दौंड, जि. पुणे) हा आपल्या अॅक्टिव्हा दुचाकीवरून जात असताना सोरतापवाडी फाटा येथे पुणे-सोलापूर महामार्ग ओलांडत होता. त्यावेळी सोरतापवाडी बाजूकडून भरधाव वेगात येणाऱ्या हायवा ट्रकने (क्र. एमएच १२ वाय क्यू ५७९७) त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

Advertisement

या अपघातात विक्रम याच्या डोक्याला व तोंडाला गंभीर दुखापत होऊन तो बेशुद्ध झाला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला तातडीने सिद्धिविनायक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या घटनेप्रकरणी मृताचा भाऊ कृष्णा दयानंद सुर्यवंशी (वय २०) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हायवा चालक सुनिल जगन्नाथ शिंगटे (रा. सोरतापवाडी, ता. हवेली, जि. पुणे) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २८१, १०६(१), १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस पुढील तपास करत आहेत.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!