गुन्हे शाखा यूनिट 3 ची धडाकेबाज कामगिरी चांदणी चौकातून अंमली पदार्थ प्रकरणातील आरोपी ताब्यात यूनिट 3 ची धडाकेबाज कामगिरी


गुन्हे शाखा यूनिट 3 पुणे शहर 

पुणे प्रतिनिधी उषा सोनवणे 

महा पोलिस न्यूज ऑनलाइन पुणे, दि. ४ : उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ (कलम ८(क), २२(क), २९) अंतर्गत दाखल गुन्हा क्रमांक ३७/२०२६ मधील पाहिजे आरोपीस गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाने चांदणी चौक, कोथरूड येथून ताब्यात घेतले.

Advertisement

ओंकार विनोद पवार (वय २६, रा. दुर्गामाता गार्डनजवळ, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे) हा आरोपी फरार होता. त्याचा शोध सुरू असताना पोलीस हवालदार अमित बोडरे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असून तो चांदणी चौक परिसरात आला आहे.

त्यानुसार वरिष्ठांच्या परवानगीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. चांदणी चौक येथील एका पानटपरीवर संशयित इसम आढळून आला. त्यास ताब्यात घेऊन पौड रोड येथील गुन्हे शाखा युनिट ३ कार्यालयात आणण्यात आले.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!