सराईत गांजा विक्रेत्यावर कारवाई, १०,०००/- रु किमतीचा अमंली पदार्थ केला हस्तगत
श्रावणी कामत पुणे प्रतिनिधी
महा पोलीस न्यूज ! :- ऑनलाईन पुणे:- लोणावळा-पुणे ग्रामीण जिल्ह्यात अंमली पदार्थाचे उत्पादन, साठा, विक्री, सेवन, करणारे इसमावर कारवाई करण्याचे अनुषंगाने श्री संदिप सिंह गिल्ल पोलीस अधिक्षक सो पुणे ग्रामीण श्री. रमेश चोपडे अपर पोलीस अधिक्षक सो, पुणे विभाग व श्री. गजाननटोम्पे उपविभागय पोलीस अधिकारी लोणावळा विभाग यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशा प्रमाणे लोणावळा शहर पोलीसस्टेशन हद्दीत पोनि राजेश रामाघरे यांचे मार्गदर्शाना खाली नेमण्यात आलेल्या पथकाद्वारे कारवाई करण्यात आली.
दि.१४/११/२०२५ रात्री ०८/३० वाजण्याचे सुमारास आगामी नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने लोणावळा शहरपोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीसांना मिळालेल्या बातमी वरुन लोणावळा रेल्वे स्टेशन जवळील निर्जनपरिसरात गांजा विक्री करणारा सराईत गांजा विक्रेता सत्तार इब्राहिम कुरेशी वय- ५८ वर्ष रा. टेबलचाळ लोणावळा याचेवरलोणावळा पोलीस स्टेशन पोलीसांनी छापा टाकुन त्याचेकडुन १०,०००/- रु किमतीचा १.११७ कि.ग्रम वजनाचा गांजा जप्तकेल्याने त्याचे विरुद्ध एनडीपीएस कायदा – १९८५ अन्वये कारवाई करण्यात आली.
सदरची कामगिरी वरिष्ठांच्या सुचना व आदेशा प्रमाणे मा. पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे लोणावळा शहर पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक पुजा गव्हाणे, पोहवा वीरसेन गायकवाड, पोहवा हनुमंत वाळुंज,पोहवा संदिप मानकर, पोना सुधीर डुंबरे, पोशि राहुल चोरगे, पोशि नागेश कमठणकर यांच्या पथकाने केली असुन गुन्ह्याचापुढील तपास मपोउनि पुजा गव्हाणे या करीत आहेत.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

