कोंढवा दामिनी मार्शल विश्वकर्मा इन्स्टिट्यूट टिळेकर नगर कोंढवा या ठिकाणी निर्भय कन्या अभियान आयोजित करण्यात आले
महा पोलीस न्यूज ऑनलाईन पुणे :- आज रोजी कोंढवा दामिनी मार्शल यांनी कोंढवा पोलीस स्टेशन अंतर्गत वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वकर्मा इन्स्टिट्यूट टिळेकर नगर कोंढवा या ठिकाणी निर्भय कन्या अभियान आयोजित करण्यात आले तरी सदर अभियाना दरम्याने कॉलेजमधील मुख्याध्यापिका अंजूम पटेल त्याचप्रमाणे कॉलेजमधील मुले मुली सर्वसाधारण 250 हजर होते*
सदर अभियान करिता दामिनी मार्शल पोलीस अंमलदार अयोध्या चेचर यांच्याकडून खालील मुद्द्यांवरती मुला-मुलींना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करण्यात आले,
निर्भया कन्या अभियान हे मुलींच्या सुरक्षते करिता त्यांचा आत्मविश्वास व संरक्षण व त्याचप्रमाणे लैंगिक अत्याचाराविरुद्ध जागृती निर्माण करण्यासाठी राबवली जाणारी अभियान आहे.
याचा उद्देश मुलींना स्वावलंबी बनवणे सजग व निर्भया बनवणे तसेच मुलांमध्ये योग्य वर्तन आदर आणि स्त्रि सुरक्षितेबद्दल संवेदनशीलता निर्माण करणे हा आहे.
मुलींसाठी मार्गदर्शन
1) अथविश्वास व व्यक्तिगत विकास
स्वतःवर विश्वास ठेवा
सार्वजनिक ठिकाणी ठामपणे बोला, स्पष्ट निर्णय घेणे
2) स्वरक्षण करणे ( Self defence)
सेल डिफेन्स प्रात्यक्षिक दाखवण्यात आले
आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीबद्दल सतर्क रहा
ट्रॅव्हल करीत असताना आपले लोकेशन आपल्या घरातल्यांना किंवा जवळच्या मित्रांना सेंड करून ठेवा
रात्रीच्या वेळी प्रवास करीत असताना आपल्या सुरक्षिते करिता काही वस्तू स्प्रे बॉटल, टोकदार वस्तू कॅरी कराव्यात
3) कायद्यांची माहिती
IPC 354 – छेडछाड
Ipc 376 – बलात्कार
Pocso Act अल्पवयीन मुलीवर अत्याचार
Police helpline number 112,1091,1930
कोणत्याही प्रकारे त्रास झाला ताबडतोब तक्रार करायची धाडस ठेवा न घाबरून न लाजता बदनामीला घाबरू न जाता आपल्याबरोबर झालेला सर्व प्रकार त्या ठिकाणी सांगणे
स्वतःच्या सुरक्षेतेचा विचार करा
4) *सोशल मीडिया सुरक्षा*
अनोख्या लोकांशी मैत्री करू नये कोणालाही वैयक्तिक लोकेशन किंवा आपले फोटो शेअर करू नयेत कुठल्याही प्रकारे आपल्याला सोशल मीडिया वरती धमकवले जात असेल किंवा आपल्या फोटोचा गैरवापर करून मोफिंग किंवा सायबर बुलिंग,ओळखून तात्काळ सायबर हेल्पलाइन नंबर वरती कॉल करून किंवा मेल आयडी वरून मदत घ्यावी
ऑनलाइन अनोळख्या व्यक्तीशी कुठल्याही प्रकारे लिंक द्वारे या ओटीपी सांगून या कुठल्याही प्रकारे कुठल्याही अमिषांना बळी न पडता व्हेरिफाय केल्याशिवाय कोणाबरोबर व्यवहार करू नयेत
5)मुलांबद्दल मार्गदर्शनमुलींना कमजोर म्हणून न पाहता आपल्या घरातील आई बहिण यांच्याप्रमाणेच इतर मुलींशी वाघावे त्यांचा आदर करावा कोणत्याही मुलीशी चुकीचे वर्तन करू नये कोणत्याही महिलेविषयी किंवा मुली विषयी चुकीचे वर्तन करू नये किंवा त्यांच्याशी चुकीचे वागू नये.
6) जबाबदाऱ्याची भावना व्यक्त करा कॉलेजमध्ये किंवा आपण राहत असलेल्या ठिकाणी कोणत्याही ठिकाणी इतर महिलेला जर त्रास होत असेल तर आपण त्यांना मदत करणे अपेक्षित आहे.
त्या ठिकाणी काही चुकीचं होत असेल तर आपण त्या ठिकाणी पोलिसांना कळवणे व त्यांना मदत करणे या सर्व गोष्टी आपल्या सुरक्षित करत असून सुरक्षित समाज मुलींच्या सुरक्षेने नव्हे तर मुलांच्या वरील संस्कार आणि सामूहिक जागृती यातून करता येईल हे महत्त्वाचे आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

