अमेरिकन नागरिकांची फसवणुक करणाऱ्या ०२ बनावट कॉलसेंटर मधील २३ व्यक्तीवर सायबर पोलीस ठाणे व गुन्हे शाखा, युनिट ०२ यांचेकडुन संयुक्त कारवाई


सुनील सांगळे पुणे प्रतिनिधी
सायबर पोलीस ठाणे व गुन्हे शाखा, युनिट ०२ 
महापोलीस न्यूज ऑनलाइन पुणे पिंपरी चिंचवड पोलस आयुक्तालय हद्दीत हिंजवडी भागात वेगवेगळे बनावट कॉल सेंटर असल्याची माहीती मा. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना प्राप्त झाली होती. त्याप्रमाणे मा. पोलीस आयुक्त यांनी सायबर पोलीस ठाणे व गुन्हे शाखा युनिट ०२ गुन्हे शाखेचे दोन पथके तयार करुन त्यांना सदर माहीती आधारे संबंधीत कॉलसेंटरवर छापा टाकुन कारवाई करण्याबाबत आदेशित करण्यात आले होते. त्याप्रमाणे सायबर पोलीस ठाणेचे पोनि. रविकिरण नाळे व पथक तसेच गुन्हे शाखा युनिट २ चे अरविंद पवार व पथकाने गोपनिय माहीती काढुन मिळालेल्या माहीतीची खात्री करुन हिंजवडी फेज २. हिंजवडी, पुणे येथे वेगवेगळ्या दोन अनधिकृत कॉल सेंटरवर छापा टाकला.
त्यामध्ये सायबर पोलीस ठाणेचे पोनि, रविकिरण नाळे व पथकाने छापा टाकलेले अनाधिकृत कॉल सेंटरचे नांव स्काय हाय सोलुशन असुन सदर कॉलसेंटरमधील कॉलसेंटरचे मालक, मॅनेजर व त्यांचे ०७ कर्मचारी वेगवेगळ्या संगणकावर व लॅपटॉपवर हेडफोन लावुन टेलिसीएमआय, डायलर तसेच Phound या सॉफ्टवेअरचा चा वापर करुन अमेरीकेतील नागरीकांशी वेगवेगळया सुडो नावाने इंग्रजीमध्ये अमेरिकेतुन मेडीकल हेल्थ डिपार्टमेंट बोलत असल्याचे सांगुन राउंड अप, झानटॅक औषधे, टाल्कम पावडर इत्यादीच्या वापरामुळे त्यांना कॅन्सर, नॉन हॉकिंग लिंफोमा, ब्लड कॅन्सर अशाप्रकारचे गंभीर रोग होतात असे सांगुन अशा प्रकारे सदर औषधे व टाल्कम पावडर वापरणारे तसेच त्यांचेपैकी असे गंभीर आजार असलेल्या इसमांची कॉलव्दारे माहिती घेतली जात असे. तसेच त्यांना नमुद राउंड अप पेस्टीसाईस, झानटॅक या औषध कंपनी विरोधात कोर्टात जाण्यासाठी व त्यामधुन चांगले कम्पेंसेशन मिळवुन देण्याचे अमीष दाखवुन त्यांची माहीती अमेरिकेतील लॉ फर्मला दिली जात असे. त्यानंतर सदर लॉफर्म कडुन डॉलर स्वरुपात रक्कम प्राप्त करण्यात येत होती. त्याचप्रमाणे सदर कॉल सेंटरवरून अमेरिकेतील लोकांना कम्युनिटी चॉईस फायनान्सियल कंपनीतुन बोलत असल्याचे सांगुन लोन मिळवुन देण्याचे अमीष दाखवुन लिंकद्वारे त्यांचे बैंक डिटेल्स, युजर आयडी, पासवर्ड इत्यादी माहीती घेवुन त्यांना त्यांचा क्रेडीट स्कोर खराब असल्याचे सांगुन तो चांगला करुन देण्यासाठी गिफ्ट व्हाऊचर, डॉलरच्या माध्यमातुन रक्कम घेत असल्याची माहीत प्राप्त झाली. सदर कॉलसेंटरवरुन अमेरिकन नागरीकांशी बोलण्यासाठी रिक्रप्ट तयार करुन त्याप्रमाणे बोलले जात होते. सदर कॉलसेंटरवर असलेले ०९ संगणक, ०२ लॅपटॉप, स्क्रिप्ट ची पाहणी करण्यात आली असता सदरचा प्रकार उघडकीस आल्याचे व सदर कॉलसेंटर अवैध असल्याचे निष्पन्न झाल्याने स्काय हाय सोलुशन या कंपनीचे मालक सागर कुमार यादव वय ३२ वर्षे, फेज-२, हिंजवडी, पुणे व मॅनेजर आनंद पंकज सिन्हा वय २९ वर्षे, रा. वृंदावन सोसायटी, वाघोली, पुणे. याचेसह कॉलसेंटरमध्ये काम करणारे ०७ इसमांविरुध्द सायबर पोलीस ठाणे येथे गु.र.नं ४६/२०२५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच सदर कॉलसेंटरमधील गुन्हयासाठी वापरण्यात येत असलेले इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईसेस, संगणक, लॅपटॉप जप्त करण्यात आले असुन सदर कॉलसेंटरचे मालक व मॅनेजर यांना अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींकडे तपास चालु आहे.
त्याचप्रमाणे दुसरे कारवाईमध्ये गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस निरीक्षक श्री. अरविंद पवार व पथकाने त्याच बिल्डींगमध्ये टेक लॉ सोलुशन, ऑफिस नं ६१२ गेरा इम्पेरियल, हिंजवडी फेज २, पुणे या कॉलसेंटवर छापा टाकला. छाप्यामध्ये सदर कॉलसेंटरमध्ये बेलटॉक या अॅपद्वारे त्यांच्या स्वतःच्या नावाचा वापर न करता त्यांच्या ऑफिसचा मालक नामे धनंजय कासार याने दिलेल्या सुडोनेमचा वापर करुन अमेरिकेतील नागरीकांना मेडीकल हेल्थ डिपार्टमेंट मधुन बोलत असल्याचे सांगुन राऊंड अप पेस्टीसाईड, पॅराकॉट पेस्टीसाईड, टॅलकम पावडर, रोबलॉक्स, सोलर पॅनल हे प्रोडक्ट त्यांनी युज केले आहे का ? केले असेल तर त्याचा प्रुफ आहे का? त्या प्रोडक्टचा साईड इफेक्ट झाला का? असेल तर प्रुफ आहे का असे विचारुन त्यांचे नाव, पत्ता मोबाईल नंबर इत्यादी माहीती घेवुन सदर माहीती अमेरिकेतील लॉ फर्मला पाठवुन त्याद्वारे कमिशन स्वरुपात पैस कमवित असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन सदर कॉल सेंटरचे मालक धनंजय साहेबराव कासार, मॅनेजर हर्षद शंकर खामकर व तेथे काम करणारे इतर ११ जणांविरुध्द सायबर पोलीस ठाणे येथे गु.र.नं ४७/२०२५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच कॉलसेंटरमध्ये गुन्हयासाठी वापरण्यात येणारे संगणक, लॅपटॉप इत्यादी इलेक्ट्रॉनिक मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन कॉल सेंटर मालक धनंजय साहेबराव कासार, वय-२५ वर्षे, रा माण, ता-मुळशी, जि-पुणे. व मॅनेजर हर्षद शंकर खामकर वय-२८ वर्षे, रा- गौतम पी.जी, सेल पेट्रोल पंपाजवळ, हिंजवडी पुणे यांना अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींकडे तपास चालु आहे.
सदर दोन्ही गुन्हयाचा अधिक तपास रविकिरण नाळे, पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे, पिंपरी चिंचवड हे करीत असुन सदर आरोपींना दि. १८/११/२०२५ पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजुर करण्यात आली असुन सदरबाबत अधिक तपास चालु आहे. सदर छापा कारवाई दरम्यान एकुण २० हार्डडिस्क, ०३ लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत.
सदरची कारवाई मा. विनय कुमार चौबे, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. डॉ. शशिकांत महावरकर, सह पोलीस आयुक्त, मा. सारंग आव्हाड अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, डॉ. शिवाजी पवार पोलीस उप आयुक्त गुन्हे, डॉ. विशाल हिरे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे-१ यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस निरीक्षक अरविंद पवार गुन्हे शाखा युनिट-२ व त्यांचेकडील पोलीस अंमलदार, सायबर पोलीस ठाणेकडील पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सपोनि प्रविण स्वामी, पोउनि, रोहीत डोळस इतर पोलीस अंमलदार यांचे पथकाने केली असुन सदर आरोपी यांची पोलीस कोठडी रिमांड मिळणेकामी सरकारी अभियोक्ता श्री. सुरज मोहीते यांनी सरकार पक्षातर्फे मा. न्यायालयात बाजु मांडली आहे.

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!