चैनस्नॅचिंग चोरी करणाऱ्या तसेच परराज्यातील गुन्ह्यामध्ये पाहिजे असलेल्या गुन्हेगारास कोथरुड पोलीसांकडून बेडया:


कोथरुड पोलीस ठाणे, पुणे शहर

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- पुणे शहरांमध्ये चैन स्नॅचिंग गुन्ह्यांचे अनुषंगाने मा. पोलीस आयुक्त साो, पुणे शहर यांचेकडून आरोपींचा शोध घेवून गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने मा. पोलीस उपआयुक्त, परि ०३, श्री. संभाजी कदम, यांचे मार्गदर्शनाखाली कोथरुड पोलीस ठाणे, तपास पथक अधिकारी व अंमलदार यांचेमार्फत चैनस्नॅचिंग गुन्हेगारांची शोध मोहिम राबविण्यात येत होती.

दि. ०३/०९/२०२४ रोजी उजवी भुसारी कॉलनी, कोथरुड, पुणे येथे मॉर्निंग वॉक साठी आलेल्या वयोवृध्द महिलेच्या गळयातील सोन्याची चैन दोन अनोळखी चोरट्यांनी हिसका मारुन चोरी करून मो. सायकलवरून पळून गेले सदरबाबत कोथरुड पो. ठाणे, येथे गुन्हा रजि नं २५४/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३०४(२), ३०९ (६), ३(५) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
नमुद गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याचे अनुषंगाने कोथरुड पो. ठाणे कडील तपास पथकातील सपोनि बालाजी सानप, पोलीस अंमलदार, ज्ञानेश्वर मुळे, आकाश वाल्मिकी, विष्णु राठोड यांनी अथक परिश्रम घेवून घटनास्थळ ते आरोपींचे जाण्याचे मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची ६ दिवस पाहणी करून आरोपी नामे- १) राकेश गोकुळ राठोड, वय २१ वर्षे, रा. सुप्रीप कॉलनी, एम.आय.डी.सी रोड, जळगाव, २) आदित्य कुंडलिक माझिरे, वय १९ वर्षे, रा. मु. पो. रावडे, ता. मुळशी, जि. पुणे यांना निष्पन्न करून ताब्यात घेवून गुन्ह्यामध्ये अटक करून तपासादरम्यान आरोपींकडून एकूण १,९८,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल (२५ ग्रॅम सोन्याची चैन, २१ ग्रॅम सोन्याचे मंगळसुत्र, एक युनिकॉर्न मो.
सायकल, मोबाईल इ.) जप्त करून ताब्यात घेतला आहे.
सदर गुन्ह्याचे तपासादरम्यान आरोपी राकेश गोकुळ राठोड हा जळगाव येथील रेकॉर्डवरील आरोपी असलेबाबत व त्याचेविरुध्द जबरी चोरी, चोरी, घरफोडी, दरोडा यासारखे १५ गंभीर गुन्हे नोंद असलेबाबत दिसून आले.

तसेच नमुद आरोपी १) रामानंदनगर पो. ठाणे, जळगाव, २) चोपडा पोलीस ठाणे, जळगाव, ३) भावरकुवा पो. ठाणे, इंदोर, मध्यप्रदेश येथील चैनचोरी, वाहनचोरी गुन्ह्यामध्ये पाहिजे आरोपी असलेबाबत निष्पन्न झाले असून तपासादरम्यान कोथरुड पोलीस ठाणे कडील २ चैनस्नॅचिंगचे गुन्हे उघड झाले आहेत. अशा प्रकारे आंतरराज्यामध्ये चैनस्नॅचिंग, चोरी यासारखे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांस कोथरुड पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

सदरची कामगिरी ही मा. श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. रंजनकुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. प्रविण पाटील, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. श्री. संभाजी कदम, पोलीस उपआयुक्त, परिमंडळ ३, पुणे शहर व मा.श्री. सरदार पाटील, सहायक पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग, पुणे शहर यांचे अधिपत्याखाली व मार्गदर्शनाप्रमाणे संदीप नारायण देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विक्रमसिंह कदम, पोलीस निरीक्षक, गुन्हे, तपास पथक प्रभारी अधिकारी सपोनिरी बालाजी सानप, पोलीस उपनिरीक्षक, बसवराज माळी, व तपास पथकातील अंमलदार अजिनाथ चौधर, ज्ञानेश्वर मुळे, संजय दहिभाते, आकाश वाल्मिकी, विष्णु राठोड, अजय शिर्के, शरद राऊत, मंगेश शेळके यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!