गुन्हे शाखा युनिट २ ची दमदार कामगिरी ! घरफोडी गुन्हयातील पाहिजे आरोपीस केले जेरबंद
पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626
गुन्हे शाखा युनिट २, पुणे शहर
महा पोलिस न्यूज ! ऑनलाइन पुणे:- दिनांक ०६/१२/२०२५ रोजी गुन्हे शाखा युनिट २ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी व विनोद चव्हाण यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराव्दारे बातमी मिळाली की, पर्वती पोलीस स्टेशन हद्दीतील घरफोडी गुन्हयातील पाहिजे आरोपी हा सच्चाईनगर कात्रज भागात फिरत आहे. सदरची बातमी युनिट २ कडील पोलीस निरीक्षक संतोष सोनावणे यांना कळवली असता त्यांनी सदर ठिकाणी जावुन पाहणी करुन कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशीत केले.
सदर बातमीचे अनुषंगाने युनिट २ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सच्चाईमाता नगर कात्रज पुणे येथे जावून पाहणी केली असता सदर बातमीतील वर्णनाचा इसम सदर नमुद ठिकाणी मिळुन आला. त्यास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव रमेश विठ्ठलराव धोत्रे वय २४ वर्ष रा. सच्चाईमाता नगर कात्रज मंदिराचे शेजारी पुणे असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे अधिक तपास केला असता त्याने पर्वती पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडी केल्याचे निष्पन्न झाले. सदरबाबत पर्वती पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ३७४/२०२५ भा.न्या.सं.क. ३०५ (अ), ३३१(३), ३३१ (४) गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर आरोपीस ताब्यात घेवून पुढील कायदेशीर कारवाईकामी पर्वती पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. पंकज देशमुख, मा.पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री. निखील पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे शाखा श्री. विजय कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट २ पुणे शहर श्री. संतोष सोनावणे यांचे सुचनांप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, सहा. पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, विनोद चव्हाण, संजय जाधव, शंकर नेवसे, संजय आबनावे, शंकर कुंभार, ओमकार कुंभार, विशाल दळवी, साधना ताम्हाणे, अजीम शेख व सद्दाम तांबोळी यांनी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव


