गायीची कत्तल करतानाचा व्हिडीओ सोशल मिडीया वर व्हायरल करणा-या कसायासह त्याच्या साथीदारांना सदर बाजार पोलीसांनी केली अटक.


प्रमोद बापू सावंत जालना प्रतिनिधी
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन जालना  : दिनांक 01/09/2025 रोजी सोशल मिडीयावर तीन इसम गोवंश जातीचे प्राणी कापतानाचा व्हिडीओ प्रसारीत झाल्यावरून पोलीस ठाणे सदर बाजार जालना येथे व्हिडीओ मधील तीन इसमांपैकी 1) असलम महेमूद कुरेशी रा. मंगळबाजार जालना व दोन अनोळखी इसमांविरुध्द गुरनं 745/2025 कलम 299,3(5) बोएनएस सह कलम 5(क), 9.9 (अ) महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदयाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गून्हा दाखल झाल्यापासून मुख्य आरोपी असलम कुरेशी व त्याचे साथीदार फरार होते.
सदर गुन्हयातील फरार आरोपीतांचा शोध घेण्यासाठी वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे सदर बाजार जालना व स्थागूशा जालना येथील वेगवेगळे चार पथके आरोपीच्या अटकेसाठी बाहेर राज्यात हैद्राबाद तसेच खुलताबाद जि. छत्रपती संभाजीनगर, मानवत, पाथरी, परभणी रवाना करण्यात आले होते यावरून पोलीस ठाणे सदर बाजार जालना पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हयातील उर्वरीत दोन आरोपी निष्पन्न केले. सदर आरोपी हे फरार असल्याने त्यांचा तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे व गोपनिय माहिती नुसार सदर आरोपी यांचे ठिकाणाची माहिती मिळाल्याने सदर बाजार डिबी पथकाने यातील मूख्य आरोपी नामे असलम कुरेशी व सोफीयान शेख समद रा. चमडाबाजार जालना यांना सदर ठिकाणाहून ताब्यात घेतले तसेच यासीन रशीद कुरेशी रा.राजणी ता.घनसावंगी याचे ठिकाणाची माहिती मिळाल्याने सदर ठिकाणाहून आरोपीस ताब्यात घेण्यात आले. सदर आरोपीतां विरुध्द संघटीत गुन्हेगारी तसेच आयटी अॅक्ट अंतर्गत कलम वाढ करून पूढील तपास आम्ही स्वतः करीत आहोत.
सदरची कामगीरी मा.पोलीस अधिक्षक श्री. अजयकुमार बन्सल साहेब, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. आयूष नोपाणी साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अनंत कुलकर्णी साहेब यांचे मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक श्री संदीप भारती साहेब, स्थागूशा पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांचे नेतृत्वात सपोनि श्री. उबाळे (स्थागूशा), डी. बी. पथकाचे प्रमुख पोउपनि शैलेश म्हस्के, पोउपनि श्री. सचिन सानप, पोउपनि संजय गवई, पोहेको जगन्नाथ जाधव, पोहेको धनाजी का, वळे, पोहेको/सुभाष डिघोळे, पोहेको बाबा हरणे, पोहेको नजीर पटेल, स्थागूशा चे पोहेको लक्ष्मीकांत श्रीवास, प्रशांत लोखंडे, मपोहेको शारदा गायकवाड, पोकों भगवान मुंजाळ, पोकों दूर्गेश शेख, पोको गणेश तेजनकर, पोकों/ राहूल कटकम, पोकों/ धंनजय लोढे पोकों/धिरज भोसले व चालक मोहन हिवाळे, कल्पेश पाटील, सददाम सय्यद यांचे मदतीने केली.

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!