खूनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार पळून जाताना स्वारगेट पोलीसांकडून जेरबंद
विशाल कसबे पुणे शहर प्रतिनिधी
स्वारगेट पोलीस स्टेशन पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि. १८/१२/२०२४ रोजी स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गस्त करीत असताना स्वारगेट पो.स्टे. कडील पो.हवा. ५०३ कुंदन शिंदे व पो.शि. ९९३६ राहुल तांबे यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की, सच्चाई माता मंदिर, आंबेगांव, कात्रज, पुणे येथे दि. १७/१२/२०२४ रोजी झालेल्या खूनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील पाहिजे सराईत आरोपी नामे अमोल आडम हा गुन्हा करुन त्याच्या मुळगावी सोलापूर या ठिकाणी स्वारगेट एसटी स्टॅण्ड येथून पळून जाणार आहे. सदर बातमी प्राप्त होताच त्यांनी ती श्री. युवराज नांद्रे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्वारगेट पो.स्टे. यांना कळविली असता त्यांनी तातडीने एका विशेष पोलीस पथकाची नियुक्ती करुन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार रेकॉर्डवरील नमुद आरोपीस स्वारगेट एसटी स्टॅण्ड येथे सापळा रचून त्यास तो सोलापूर येथे पळून जाण्याच्या तयारीत असताना शिताफीने पकडले. त्यास त्याचा नाव पत्ता विचारता त्याने त्याचे अमोल रवी आडम, वय-२४ वर्षे, रा. आगम मंदिर, शंकरनगर, प्रथमेश अपार्ट. कात्रज, पुणे असे असल्याचे सांगून त्याने व त्याच्या साथीदारांनी दि. १७/१२/२०२४ रोजी सच्चाई माता मंदिर, आंबेगांव, कात्रज, पुणे येथे दोन जणांवर जिवे मारण्याचे उद्देशाने प्राणघातक हल्ला करुन त्यांना जखमी केल्याचे सांगितले.
सदर बाबत भारतीविद्यापीठ पो.स्टे. येथे खात्री केली असता सदर दिवशी फिर्यादी नामे समर्थ राकेश साळुंखे, वय १८ वर्षे, रा. संतोषनगर, कत्रज, पुणे याने आरोपी नामे अमोल रवी आडम व इतर पाच आरोपीविरुध्द भारतीविद्यापीठ पो.स्टे. येथे गु.रजि.नं. १०५९/२४ भान्यासंक १०९,१८९,१९०,१९१ सह भारतीय हत्यार कायदा क. ४ (२५) सह मपोकाक ३७ (१) (३) सह १३५ सह क्रिमीनल लॉ अमेंडमेन्ट कायदा क. ७ अन्वये फिर्याद दिल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आरोपी नामे अमोल रवी आडम यास त्याचेवर वर नतुद प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्याचे पुढील कायदेशीर कारवाईकामी आंबेगांव पो.स्टे. यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.
पुढील तपास आंबेगांव पो.स्टे. चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शदर झिने हे करीत आहेत.
आरोपी नामे अमोल रवी आडम हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याचेवर भारतीविद्यापीठ, येरवडा, विश्रांतवाडी, कोंढवा इत्यादी पोलीस ठाणे येथे अपहरण, खूनाचा प्रयत्न, जबरी चोरी, गंभीर दुखापत यासारखे अतिगंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. नुकताच तो स्थानबध्देतून मुक्त होवून आला होता. तसेच तो दाखल गुन्हा करुन बाहेर गावी फरार होण्यापुर्वीच पोलीसांनी त्यास जेरबंद केले आहे.
सदर उत्कृष्ठ कारवाई ही मा. श्री. अमितेशकुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. रंजनकुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. प्रवीण पाटील, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे, मा. श्रीमती, स्मार्तना पाटील, पोलीस उप-आयुक्त, परि. २, पुणे शहर, मा. श्री. दिपक निकम, सहा. पोलीस आयुक्त, लष्कर विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली स्वारगेट पो.स्टे. चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. युवराज नांद्रे, सपोनि राहुल कोळंबीकर, सपोफौ संजय भापकर, पो.अं. कुंदन शिंदे, शंकर संपते, सागर केकाण, राहुल तांबे, श्रीधर पाटील, सुधीर इंगळे, सतिश कुंभार, विक्रम सावंत, रफिक नदाफ, शदर गोरे यांनी केलेली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

