अपघातानंतर आर्थिक मागणी पूर्ण न केल्यामुळे दापोडी पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल व बनावट पंचनामा तयार केल्याचा आरोप
प्रतिनिधी श्रावणी कामत
शाळेच्या बसला धडक; वाहनधारकाचा पोलिसांवर बनावट पंचनामा करून फसवणुकीचा गंभीर आरोप
महा पोलीस न्यूज ! पिंपरी चिंचवड :– २४ मार्च २०2५ रोजी भोसरी पोलीस स्टेशनजवळ स्कूल बसचा घडलेल्या एका भीषण अपघातानंतर दापोडी पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक यांची आर्थिक मागणी पूर्ण न केल्यामुळे पीडित बस मालक श्री. अशोक जगताप यांनी पोलिसांवर खोटा गुन्हा दाखल व बनावट पंचनामा तयार करून फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. घटने संदर्भात त्यांनी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त यांना पत्राद्वारे पोलीस निरीक्षक यांना कायदेशीर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
भोसरी परिसरात २४ मार्च २०२५ रोजी सायंकाळी झालेल्या स्कूल बसच्या गंभीर अपघातानंतर, स्थानिक वाहनधारक आणि स्कूल बस मालक अशोक कृष्णा जगताप यांनी दापोडी पोलिस स्टेशनमधील पोलीस अधिकाऱ्यांवर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या मालकीची टाटा मिनी स्कूल बस (एमएच १४ CW ०५९९) रस्त्याच्या कडेला योग्य प्रकारे पार्क करून पार्किंग लाईट सुरू ठेवून चालक श्री गेणाभाऊ रघु कालेकर समोरील बाजूस असलेल्या सरकारी शौचालयात गेला होता, मागुन भरधाव वेगात येणाऱ्या आय२० कार (एम एच १४ जी एच ४४५१) उभ्या असलेल्या स्कूल बसला पाठीमागून जोरदार धडक दिली. व नंतर बाजूला असलेल्या झाडाला जाऊन आदळली. झालेला अपघात स्थानिक स्टॉलधारक यांनी बघितला असून यामध्ये स्कूलबस चालकाची चुकी नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
या अपघातात आय२० कार (एम एच १४ जी एच ४४५१) चा चालक बिल्डर व वकील हृषीकेश सुर्याकांत काळे याचा मृत्यू झाला. अशोक जगताप यांनी आरोप केला आहे की, या अपघाताची जबाबदारी मृत चालकावर असतानाही, पोलीस उपनिरीक्षक श्री. कांबळे यांनी खोटी एफआयआर तयार करून बस चालकावर दोष टाकला.अपघातानंतर ड्रायव्हर गेनाभाऊ राघो कालेकर यांनी ही घटना फोनवरून अशोक जगताप यांच्या मुलीला कळवली. त्यानंतर कोमल जगताप यांनी घटनास्थळी पोहोचून पोलिसांना घटनेची माहिती दिली आणि अपघाताचे फोटो घेतले. त्यावेळी घटनास्थळी अनेक साक्षीदार होते. पण तीन दिवसांनी पोलीसांनी पुन्हा बनावट पंचनामा तयार करून चुकीचे कागदपत्र तयार केल्याचा दावा अर्जदार मालक यांनी केला आहे.
जगताप यांनी असेही सांगितले की, त्यांच्या गाडीचे सर्व कायदेशीर कागदपत्रे – फिटनेस सर्टिफिकेट, इन्शुरन्स, ड्रायव्हरचा लायसन्स आदी सादर करूनही पोलिसांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही. उलट, मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना विमा कंपनीकडून क्लेम मिळावा या हेतूने, अपघाताची जबाबदारी त्यांच्या बसवर टाकली गेली, असा आरोपही त्यांनी केला आहे.या अपघातामुळे त्यांच्या स्कूल बसचे अतोनात नुकसान झाले आहे. एवढेच नव्हे, तर बसचा फिटनेस नूतनीकरण, टॅक्स, परमिट इत्यादी कामात अडथळा निर्माण झाला आहे.संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, आणि झालेल्या फसवणुकीबाबत न्याय मिळावा, अशी मागणी अशोक जगताप यांनी पोलीस आयुक्तांकडे अर्जाद्वारे केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

