सासूला शिवीगाळ करत लिबांच्या फोकाने मारहाण; जिवे मारण्याची जावयाची धमकी


पत्रकार बापूराव चौधरी पुणे जिल्हा 

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- उरुळी कांचन, ता. ७ ; एका ४० वर्षीय महिलेला शिवीगाळ, मारहाण करत तिचा रस्ता अडवून विनयभंग करत जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना थेऊर ग्रामपंचायत हद्दीत मंगळवारी (ता. १) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याबाबत एका ४० वर्षीय महिलेने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अशोक पारधे (रा. गंगानगर फुरसुंगी, ता. हवेली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या थेऊर परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहतात. आरोपी जावई पारधे हा त्यांच्या मोठ्या बहिणीचा जावई आहे. फिर्यादी या मोबाईलचे सीम आणण्यासाठी आरोपी पारधेच्या घरी गेल्या होत्या. त्यावेळी फिर्यादी यांनी आरोपी पारधे ला “सीम कोठे आहे’ अशी विचारणा केली होती. दोन दिवसानंतर फिर्यादी महिला आपल्या घरी जात असताना पारधे याने दुचाकीवरून पाठलाग केला. त्यांना रस्त्यावर अडवून “तू माझ्या घरी का आली होतीस?” तू माझ्याबरोबर राहत जा ? असे म्हणुन त्याने महिलेचा हात धरला व दुसऱ्या हाताने जवळील लिबांच्या फोकाने मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच ‘आजची रात्र माझ्यासोबत चल’ असे म्हणून फिर्यादीचा विनयभंग केला. तसेच आरोपीने जिवे मारण्याची धमकीही दिली.

पुढील तपास लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार करीत आहेत.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!