फ्लिपकार्ट कंपनीमधील मोबाईल चोरी करणारा युनिट 4 चे ताब्यात


पंकेश जाधव संपादक 7020794626

गुन्हे शाखा युनिट ४ पुणे शहर 

 महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- चतुर्श्रुंगी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 938/2023 भादवी कलम 381 चा गुन्हा दाखल होता.सदर दाखल गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना आज दिनांक 15/01/2024 रोजी युनिट 4 पोलीस हवा. सारस साळवी व पोलिस हवालदार हरीश मोरे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, रेंजहिल्स खडकी येथील एच टाईप बिल्डिंग समोर इसम नामे अंतू स्वामी हा येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना कमी किमतीत मोबाईल विकत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली. लागलीच युनिट 04 कडील पथकाने सदर ठिकाणी जाऊन संशयितास ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव अंतेश्वर उर्फ अंतू महालिंग स्वामी वय 21 वर्षे, राहणार- गिरनार हाइट्स फ्लॅट नंबर ३०१ जाधव नगर भाग 2, गुजरवाडी फाटा कात्रज, पुणे असे असल्याचे सांगितले. त्याच्याकडे दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करता त्याने 4 मोबाइल चोरी केल्याची कबुली दिली. त्याचे ताब्यात एकूण 04 मोबाईल रुपये किंमत 73,000/- चे मिळून आले. दाखल गुन्हा उघडकीस आणून दाखल गुन्ह्यातील आरोपी याची वैद्यकीय तपासणी करून त्यास पुढील कारवाई कामी चतु:र्श्रुंगी पोलीस ठाणे पुणे यांचे ताब्यात जप्त मुद्देमालासह देण्यात आले आहे.

Advertisement

सदरची कारवाई मा. रामनाथ पोकळे अपर पोलीस आयुक्त पुणे, मा. अमोल झेंडे पोलीस उप आयुक्त गुन्हे, मा. सतीश गोवेकर सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे -2, मा. सोमनाथ जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनिट 04 यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक,विकास जाधव, पोलिस उपनिरिक्षक जयदीप पाटील, पोलीस हवा. हरीश मोरे, सारस साळवी, विठ्ठल वाव्हळ, प्रवीण भालचिम, अजय गायकवाड, अमोल वाडकर यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!