सकल बेलदार भटका समाज संघ महाराष्ट्र राज्य यांचा काल मेळावा आशीर्वाद बेनिफिट हॉल थेऊर येथे काल संपन्न …
पत्रकार प्रमोद ( बापु ) सावंत
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- सकल बेलदार भटका समाज संघ महाराष्ट्र राज्य यांचा काल मेळावा आशीर्वाद बेनिफिट हॉल थेऊर येथे काल संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य बेलदार समाजाचे अध्यक्ष एकनाथ मामा मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष दिलीप नाना वाल्हेकर व प्रसिद्ध उद्योजक व जी बी डेव्हलपर्स उद्योग समूहाचे डायरेक्टर गुलाब (आबा ) भागुजी चौधरी उद्योजक निखिल दादा बोडके हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते व तसेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून या सकल बेलदार भटका समाजाने आपल्या मागण्या जातीचे दाखले भूमी हिन लोकांना घर बेलदार समाजाचा हा जोडधंदा असल्यामुळे इतर समाजाप्रमाणे रॉयल्टी माफ करणे या प्रमुख मागण्या यांचे पत्र श्री महाराष्ट्र राज्याचे बेलदार समाजाचे अध्यक्ष एकनाथ मामा मोहिते व महाराष्ट्राचे युवा अध्यक्ष गणेश भाऊ चव्हाण यांनी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसंच उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब यांच्यापुढे या मागण्या पत्राद्वारे मांडल्या आहेत
तसेच या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष दादासाहेब साळुंखे राजूभाऊ चव्हाण पुणे जिल्हाध्यक्ष युवा कार्याध्यक्ष विलास पवार महाराष्ट्र प्रवक्ते कैलास मोहिते आधी उपस्थित होते महाराष्ट्र कार्याध्यक्ष प्रकाश भाऊ चव्हाण हे या कार्यक्रमाला उपस्थित होते सनी मोहिते मावळ तालुका तानाजी जाधव पुरंदर तालुकाध्यक्ष संजय चव्हाण सल्लागार महाराष्ट्र राज्य व हा कार्यक्रम आयोजित करणारे उद्योजक गणेश भाऊ चव्हाण व विशाल भाऊ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

