लोणावळा शहर व लोणावळा ग्रामीण हद्दीतील पान पटरीवर मा. सत्यसाई कार्तिक सोो, सहा. पोलीस अधीक्षक सोो, लोणावळा विभाग लोणावळा यांची धडक कारवाई
पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626
लोणावळा शहर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- लोणावळा शहर व ग्रामीण हद्दीमध्ये मा. सत्यसाई कार्तिक सोो, सहा. पोलीस अधीक्षक सोो, लोणावळा विभाग लोणावळा यांना गोपनीय बातमी दारा मार्फत बातमी मिळाली की, पानटपरीवर गांजा, एम.डी पावडर यांची पानामध्ये मिसळुन शाळा व कॉलेज मधील मुलांना सर्रासपणे विक्रीकेली जाते असे माहिती मिळल्याने सदर माहितीच्या अनुषंगाने
लोणावळा शहरातील १) प्रेम बाळासाहेब जाधव वय १९ रा. शिलाटणे ता. मावळ पान स्टॉल नाव नाव चैतन्य पान शॉप-रायवूड मंदीर रोड २) नरेश नगाराम सुर्यवंशी वय ४५ रा. लोणावळा ता. मावळ पान स्टॉल नाव नरेश पान शॉप ३) विनायक शंकर दहिभाते वय २८ रा. कामशेत ता. मावळ पान स्टॉल नाव साईरतन पान शॉप ४) निखील हरिदास आझाणकर वय २४ रा. पांगोळली ता. मावळ पान स्टॉल नाव महालक्ष्मी पान शॉप ५) राहुल सुनिल शेलार वय २१ रा. औंढे ता. मावळ पान स्टॉल नाव पैलवान पान शॉप याठिकाणी जावुन सदर टपरीची तपासणी केली असता सदर टपरी मध्ये मिळुन आलेल्या पावडर व इतर पानात मिक्स करणारे साहित्य ताब्यात घेण्यात आलेले असुन सदर पावडर व इतर साहित्य तपसाणी करीता मा. अन्न प्रशासन पुणे यांच्याकडे तपासणी करीता पाठविण्यात येणार असुन मा. अन्न प्रशासनाचा रिपोर्ट आल्यानंतर सदर पानटपरी मालक व चालक यांच्या विरुध्द योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
तसेच लोणावळा शहर व ग्रामीण पान टपरी मालक व चालक यांनी पानटपरीवर १८ वर्षाखालील मुलांना तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणार नाही, पानटपरी वेळेत बंद करणे व पानटपरी मध्ये १८ वर्षाखालील मुलांना तंबाखूजन्य पदार्थ दिले व विकत देणार नाहीत याबाबतचा फ्लेक्स बोर्ड तयार करुन लावण्यात यावा पानटपरी मध्ये सी.सी.टि.व्ही कॅमेरा लावणे इत्यादी सक्त सुचना मा. सत्यसाई कार्तिक सोो, यांनी दिल्या आहेत तसेच पोलीस स्टेशन कडुन टपरी चालक व मालक यांना पानटपरी बाबत योग्य ती कायदेशीर लेखी नोटीस देण्यात येणार आहेत व मा. मुख्याधिकारी सोो, लोणावळा नगर परिषद लोणावळा यांना शाळा व महाविद्यालयाच्या १०० मिटरच्या आवारातील तंबाखु व इतर तत्सम पदार्थ विकणा-या पान पटरी वर तात्काळ कारवाई करणे बाबतचे लेखी पत्र देण्यात आलेले आहे.
सदर पानटपरी धडक कारवाईत मा. सत्यसाई कार्तिक सोो, सहा. पोलीस अधीक्षक सोो, लोणावळा विभाग लोणावळा यांच्या उपस्थिती व लोणावळा शहर पोलीस स्टेशन सुहास जगताप पोलीस निरीक्षक, राहुल लाड सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार शेखर कुलकर्णी, हनुमंत शिंदे, आदित्य भोगाडे, अंकुश पवार, पवन कराड असे कारवाई करीता हजर होते.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

