महाडा चे फ्लॅट मिळून देतो असे सांगून हजारो नागरिकांची लाखो रुपयाची फसवणूक करणारा भामटा युनिट १ च्या जाळ्यात.
पुणे ब्युरो चीफ-डॅनियल ॲनथोनी
गुन्हे शाखा युनिट १ पिंपरी चिंचवड शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- तुम्हाला म्हाडाचे घर मिळवून देतो असे सांगून हजारो नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका भामट्याला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत .या गुन्ह्यातील विशेष बाब म्हणजे हा भामटा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खोट्या लेटरहेडवर लोकांना फ्लॅट ची लॉटरी लागली असल्याबाबत खोटे पत्र स्वतःच्या नावाने देत होता.
प्रतीक राजेश धाईंजे (वय २५,वर्ष रा.श्रमजीवी शाळा गल्ली नंबर ०२,दिघी रोड भोसरी )असे अटक केलेल्या या भामट्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसापूर्वी एका स्थानिक वृत्तपत्रांमध्ये एक बातमी प्रसिद्ध झाली होती .या बातमीमध्ये एक इसम पिंपरी चिंचवड शहर व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना महाडाचे फ्लॅट मिळवून देतो असे सांगून हजारो नागरिकांची फसवणूक करीत आहेत .तसेच आतापर्यंत सदर इसमाने नागरिकांना लाखो रुपयाचा गंडा घातला आहे .याशिवाय तो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कोट्या लेटरहेडवर फ्लॅटची ही लॉटरी लागली असल्याबाबत प्रतिक राजेश धाईजे या नावाने खोटे पत्र देत असल्याचे वृत्त होते.
या वृत्ताची पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनायक कुमार चौबे यांनी गंभीर दखल घेऊन गुन्हे शाखा युनिट ०१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड ,पोलिस अंमलदार सोमनाथ बोराडे ,अजित रूपनवर यांना मार्गदर्शन केले.
सदर इसम प्रतीक धाईंजे यांच्याबाबतीत माहिती घेत असताना स्टाफला गोपनीय माहिती मिळाली की सदर इसम हा भोसरी रोडच्या कडेला फुगे प्रायमा बिल्डिंग येथे थांबलेला आहे ,मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड व वरील स्टाफ यांनी सदर इसम प्रतीक धाईजे याला ताब्यात घेतले.
चौकशी दरम्यान प्रतिक धाईजे याने पिंपरी चिंचवड शहर व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना महाडाचे फ्लॅट मिळून देतो असे सांगून शेकडो रुपयांची फसवणूक करून लाखो रुपये घेतले असल्याचे निष्पन्न झाले .अटक प्रतीक धाईजे याच्याबद्दल नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ,तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अशा प्रकारे नागरिकांची फसवणूक करणाऱ्या इसमावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त (गुन्हे)संदीप डोईफोडे यांनी सांगितले आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे ,सह आयुक्त डॉ.शशिकांत महावरकर ,अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी ,पोलीस उप आयुक्त( गुन्हे)संदीप डोईफोडे ,सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ.विशाल हिरे ,सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिटी १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड ,पोलिस अंमलदार सोमनाथ बोराडे ,मनोज कुमार कमले अजित रुपनवर,तुषार वराडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

