गुन्हे शाखा युनिट 3 ने आरोपी नितीन कराळेला केले तडीपार
पंकेश जाधव संपादक 7020794626
गुन्हे शाखा युनिट ३ पिंपरी चिंचवड शहर
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- आज दि 08/04/2024 रोजी गुन्हे शाखा युनिट 3 कडील पो.हवा. 479 सानप, पोशिं 1281 कोळेकर,पोशि 2296 सागर जैनक असे पाहिजे तडीपार आरोपीचा शोध घेत असताना पोशि 1281 कोळेकर यांना मिळालेल्या बातमीनुसार चाकण तडीपार आरोपी नितीन कराळे हा चाकण शेलपिंपळगाव येथे येणार आहे अशी माहिती असता सदर पथकाने तडीपार आरोपी इसम नामे नितीन रामदास कराळे वय 28 वर्ष रा. शेल पिंपळगाव खेड जि. पुणे यास शेल पिंपळगाव येथून ताब्यात घेउन पुढील कारवाई करिता वैदकीय तपासणी करून रिपोर्टसह चाकण पोलीस स्टेशन ला हजर करुन त्याचेवर म.पो.का.कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कामगिरी ही गुन्हे शाखा युनिट 3 पिंपरी चिंचवड कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शैलेश गायकवाड साहेब व पोहवा. विठ्ठल सानप, पोलिस अंमलदार योगेश्वर कोळेकर, सागर जैनक यांनी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

