अखिल भवानी पेठ पोलीस लाईन श्री गणेश तरुण मंडळाचा एक अनोखा स्तुत्य उपक्रम…


पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे सोमवार दिनांक २४ नोव्हेंबर २०२५ रोजी पुणे शहर पोलीस दलातील एक नावाजलेले व्यक्तिमत्व,थोर गणेशभक्त मंडळाचे दिवंगत आधारस्तंभ व सर्वांचे लाडके मामा म्हणजेच कै.दत्तात्रय मामा नरळे यांच्या वाढदिवसानिमित्त व त्यांच्या स्मरणार्थ मंडळातर्फे ईशप्रेम निकेतन,पदमजी पार्क,लेन नंबर १,पुणे या वृद्धाश्रमात फळे वाटप व बिस्कीट वाटप हा एक आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला. त्या उपक्रमा निमित्त वृद्धाश्रमात एकूण ३० ते ३५ वृद्ध महिला व पुरुष उपस्थित होते तसेच डे केअर सेंटरला असलेली इतर लहान मुले देखील उपस्थित होती. अशाप्रकारे सर्वांना फळे,बिस्किट व खाऊ वाटप करून लाडक्या मामांना एक प्रकारे स्मरण केलेव्ही त्यांनी दिलेली सामाजिक कार्याची शिकवण ही लक्षात घेऊन सदरचा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला…
वृद्धाश्रमात फळे,बिस्किट व खाऊ वाटप हा कार्यक्रम मंगेशदादा रोकडे व सुमित (छोट्या) खुट्टे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला.
या कार्यक्रमाकरिता जयंत साळुंखे,अभि साळुंखे,सागर जावळे,आदित्य दांगट,सनी शिंदे,अभि माने,कामरान शेख,अक्षय शिंदे,पिनू माने,निखिल भोसले,भैय्या शिरगावकर,प्रदीप शिंदे,श्रीकांत मखरे,तुषार माळवदकर,अजय खोत,स्वप्नील सुर्वे,राहुल धोत्रे,अक्षय धुमाळ,हितेश कुलकर्णी,अक्षय चंदनशिवे,रोहन जगदाळे,सयाजी सूर्यवंशी,सचिन लोहार , शुभम दोडके व मंडळाचे इतर लहान मोठे कार्यकर्ते देखील उपस्थित होते.

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!