तरुणावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन आरोपींना घेतले ताब्यात


­ आसमा सय्यद पुणे प्रतिनिधी
आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे  :- दिनांक ०२/११/२०२५ रोजी सीसीडी कॅफे, पुणे-बेंगलोर हायवे, आंबेगाव बु. पुणे परिसरात दोन तरुणांमध्ये झालेल्या वादातून एका तरुणावर लोखंडी हत्याराने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी नामे मृणाल दिपक जाधव वय २० वर्ष, रा. कात्रज पुणे यास अटक केली. तसेच दोन विधी संर्धर्षित बालक यांना ताब्यात घेतले.
सदर बाबत अआंबेगाव पोलीस स्टेशन येथे गु.र.नं २८७/२०२५, भा.न्या.सं.क. १०९, ३(५). आर्म अॅक्ट क. ४ (२५), क्रिमिनल अमेंडमेंट अॅक्ट कलम ०७, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) १३५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदरची कामगीरी मा.पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-०२. पुणे शहर, श्री. मिलींद मोहिते, मा. सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर, श्री. राहुल आवारे यांचे मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शरद झिने, पोलिस निरीक्षक (गुन्हे) श्री. चोरमले यांचे सुचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक फिरोज मुलानी, पोलीस अंमलदार विशाल मगदुम, भिवा वाघमारे व राहुल मोहिते यांनी केली आहे.

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!