भारतीय स्वांतत्र्य दिन ध्वजारोहण समारंभ येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे मा. श्री. प्रशांत बुरडे (भा पो से) अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा यांचा हस्ते पार पडला….


पंकेश जाधव संपादक 7020794626

येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे-०६.

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक १५ ऑगस्ट २०२४ रोजी भारतीय स्वांतत्र्य दिन ध्वजारोहण समारंभ येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे मा. श्री. प्रशांत बुरडे (भा पो से) अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे हस्ते व मा. डॉ. जालिंदर सुपेकर (भा.पो.से) विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) महाराष्ट्र राज्य पुणे, मा. श्रीमती स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, येरवडा, पुणे मा. श्री. नितीन वायचळ, प्राचार्य, दौलतराव जाधव तुरुंगाधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय, पुणे व मा. श्री. सुनिल एन ढमाळ, अधीक्षक, येरवडा मध्यवर्ती कारागृह तसेच कारागृह अधिकारी / कर्मचारी यांचे उपस्थितीत पार पाडला.

Advertisement

स्वातंत्र्य दिनानिमित्त कारागृह विभागात उल्लेखनिय कर्तव्य बजावलेल्या एकुण पाच अधिकारी / कर्मचारी यांना सन्मा. राष्ट्रपती महोदयांचे राष्ट्रपती पद घोपीत झाले आहे. त्यामध्ये Presidents Medal For Meritorious Service 2024 श्री. नितीन वायचळ, प्राचार्य, दौलतराव जाधव तुरुंगाधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय, पुणे, श्री. शिवाजी पांडुरंग जाधव, तुरुंगाधिकारी श्रेणी-०१, ठाणे मध्यवर्ती कारागृह, ठाणे, श्री. दिपक सुर्याजी सावंत, सुभेदार, मुंबई मध्यवर्ती कारागृह, मुंबई, श्री. जनार्दन गोविंद वाघ, हवालदार, मुंबई मध्यवती कारागृह, मुंबई यांना घोषीत झाले. Presidents Medal For Distinguished Service 2024 श्री. अशोक बोवाजी ओलंबा, हवालदार मुंबई मध्यवती कारागृह यांना घोषीत झाले. त्यावेळी मा. महोदयांनी पदक विजेते अधिकारी / कर्मचारी यांचा सत्कार करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच श्री. संजित रघुनाथ कदम, सुभेदार यांना मा. राष्ट्रपती महोदयांचे Presidents Medal For Distinguished Service 2022 चे पदक मा. श्री. प्रशांत बुरडे (भा पो से) अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे शुभहस्ते प्रदान करण्यात आले.

तसेच मा. उच्च न्यायालय, मुंबई क्रिमिनल जनहित याचिका क्र. ०८/२०२२ नुसार कारागृहातील बंद्यांना ई-मुलाखत (इं-प्रिझन्स प्रणालीतील) या सुविधेचा लाभ देण्यात येत आहे. त्यामध्ये ई-प्रिझन्स संगणकीकरण प्रकल्पांव्दारे बंदी नातेवाईक व वकील मुलाखत या ऑनलाईन सुरु करण्यात आलेल्या आहेत. सदर सुविधेसाठी आधुनिक सर्व सोई-सुविधा युक्त “ई-मुलाखत” कक्षाचे उ‌द्घाटन आज दि.१५.०८.२०२४ रोजी मा. श्री. प्रशांत बुरडे (भा पो से) अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे शुभहस्ते व मा. डॉ. जालिंदर सुपेकर (भा.पो.से) विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) महाराष्ट्र राज्य पुणे व मा. श्रीमती स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, येरवडा, पुणे तसेच कारागृह अधिकारी / कर्मचारी यांचे उपस्थितीत करण्यात आले.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!