मुंढवा पोलीस स्टेशन हद्दीत आरोपींचा कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला…
पंकेश जाधव संपादक 7020794626
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- मुंढवा पोलीस स्टेशन हद्दीत दि २०/०३/२०२४ रोजी फिर्यादीचे ओळखीचे तीन साथीदार नामे आश्विन पिल्ले , सिमोन नगरकंती व इसम १ यांनी फिर्यादी कडे येऊन फिर्यादी यास “तू विनितचा ट्रॅप लावला का ” असे म्हंटले असता धमकी व शिवीगाळ करून विनोद छत्री यास बोलवून हाताने मारहाण करून व शेजारच्या हार्डवेअर चे दुकानात जाऊन आरोपी यांनी फावडा घेऊन आले व फिर्यादी यास फावड्याच्या टोकाने जिवे मारून टाकण्याच्या उद्देशाने प्रहार करून त्यात फिर्यादी यांना गंभीर दुखापत होऊन फिर्यादी ससून हॉस्पिटल येथे उपचाराकरिता गेले व सदर प्रकरण लक्षात घेता फिर्यादी यांनी मुंढवा पोलीस स्टेशन येथे आपली कायदेशीर फिर्याद नोंदवली व दुखापत पाहता पोलिसांनी भा द वी कलम ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल केला सदर फिर्याद लक्षात घेता फिर्यादी पक्षातर्फे सरकारी वकीलास सहाय्य ॲड. शैलेश बेरे-पाटील यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून मे. कोर्टाने सदर आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

