‘’राज्यस्तरीय कारागृह महिला अधिकारी,कर्मचारी परिषद आणि सांख्यिकी पुस्तिका-२०२२ चे प्रकाशन’


संपादक :- पंकेश जाधव 7020794626

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दिनांक – ०६.०३.२०२४ रोजी राज्यस्तरीय कारागृह महिला अधिकारी,कर्मचारी परिषद उदघाटन आणि महाराष्ट्र कारागृह सांख्यिकी सन २०२२ पुस्तीकेचे प्रकाशन मा. ना. डॉ. नीलम गोऱ्हे उपसभापती, विधान परिषद, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या शुभहस्ते तसेच मा. श्री.अमिताभ गुप्ता (भा.पो.से.)अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा,महाराष्ट्र राज्य, पुणे आणि मा. श्रीमती स्वाती साठे,कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, पुणे तसेच सांख्यिकी अधिकारी श्री. श्रीकांत जावरकर यांच्या उपस्थितीत कारागृह कर्मचारी भवन, दौलतराव जाधव तुरूंगाधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय, येरवडा, पुणे येथे सुरु झाला.

सदर परिषदेत खालीलप्रमाणे व्याख्यात्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये महिलांचे आरोग्य या विषयावर डॉ. शिल्पा थोरात आणि योगाचार्या श्रीमती रचना महाजन, महिलांबाबत कायदेविषयक माहिती – डॉ. दिपा पातुरकर (प्राचार्या लॉ कॉलेज, पुणे), महिलांचा अर्थव्यवस्थेतील सहभाग- श्रीमती शलाका जोशी (सी. ए.) श्रीमती आरती डीके (आर्थिक सल्लागार) आणि खाद्यसंस्कृतीविषयी मा. श्रीमती जुगनु गुप्ता.
सदर परिषदेत मा. ना. डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी महिला अधिकारी व कर्मचारी यांना संबोधित करताना कारागृह विभागात सेवा करणाऱ्या महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करून आजच्या परिस्थितीमध्ये कारागृह विभागात महिलांची परिषद होणे ही मोठी बाब असल्याचे सांगून आयोजकांचे कौतुक केले. स्त्री अधिकार, समाजातील त्यांची व्याप्ती, स्थान व स्त्रीवरील जबाबदाऱ्या, त्याग या सर्व मुद्यांवर माहिती देऊन आजच्या काळामध्ये स्त्रीला सन्मान व अधिकार मिळाला पाहिजे असे मत व्यक्त केले व राज्यभरातील महिला अधिकारी व कर्मचारी यांना अमूल्य असे मार्गदर्शन केले.

Advertisement

यावेळी कारागृहाचे प्रमुख मा. श्री. अमिताभ गुप्ता यांनीदेखील महिला अधिकारी व कर्मचारी यांनी आपापली जबाबदारी चांगल्याप्रकारे पार पाडावी असे सांगून महिला कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवले व “महाराष्ट्र कारागृह सांख्यिकी सन 2022” या प्रकाशनाचा उपयोग बंदींचे सुधारणा व पुनर्वसन करणेसाठी शासनास धोरणात्मक निर्णय घेण्याकरीता तसेच संशोधन व अभ्यास करणाऱ्या सर्वांना उपयुक्त ठरेल असे प्रतिपादन केले.
अशाप्रकारे “कारागृहांच्या लेकींचे” २ दिवसांच्या राज्यस्तरीय कारागृह महिला अधिकारी, कर्मचारी परिषदेच्या पहिल्याच दिवशी कार्यक्रमाचे उद्धाटन, सांख्यिकी २०२२ प्रकाशन पुस्तीकेचे विमोचन व मान्यवर महिला व्याख्यात्यांचे व्याख्यान उत्साहात पार पडले असून दिनांक ०७.०३.२०२४ रोजी विविध व्याख्याने व मान्यवरांच्या मार्गदर्शनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!