अपघात झाल्याची दिली खोटी माहिती…. मात्र गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने केला बनाव उघड.


डॅनियल अँथोनी पुणे ब्युरो चिफ 

गुंडा विरोधी पथक पिंपरी चिंचवड शहर 

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- अपघात झाला आहे असे सांगून दोन अनोळखी इसमानी एका व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच तो मयत झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले .हा अपघात नसून खून असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी तपासाची गती वाढवून मोठ्या शिताफीने तपास करून मारेकऱ्यांना वेड्या ठोकल्या आहेत.

१)दिनेश सूर्यकांत उपादे(वय १८,वर्ष रा.अजय दळवी यांच्या खोलीत ,सीएनजी पेट्रोल पंपाजवळ आदर्श नगर पिंपळे निलख.२)आदित्य शरद शिंदे (वय २५ वर्ष रा.नाटेकर निवास ,स्वराज्य हाऊसिंग सोसायटी .तळवडे रोड निगडी )असे अटक केलेल्यांची नावे आहेत तर बालाजी उर्फ बाळू मचक लांडे (वय२८ वर्षे रा.दिंद्रुड ता.माजलगाव ,जिल्.बीड )असे मयत इसमाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी (ता१७,रोजी रात्री पाऊण वाजण्याच्या सुमारास दोन अनोळखी व्यक्तींनी अपघात झाला आहे असे सांगून एका अंदाजे २५वर्षे वयाच्या जखमी असलेल्या इसमाला पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात (वायसीएम) दाखल केले होते .पण तो सदर जखमी उपचारापूर्वीच मियत झाला असल्याचे डॉक्टरने घोषित केले .रुग्णालयात दाखल करतेवेळी दोन इसमानी आपली खोटी नावे सांगितले ,तसेच नवीन नंबर प्लेट असलेल्या रिक्षाचा वापर या दोघांनी केला होता.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त संदीप डोईफोडे यांनी समांतर तपास करण्याच्या सूचना दिल्या ,समांतर तपास करीत असताना गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने ,उपनिरीक्षक जगताप ,गुंडा विरोधी पथकातील अंमलदार यांनी तत्काळ वायसीएम व आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्ही फुटेज तपास करता करता पथक चिखलीतील घरकुल योजनेतील दुर्वांकुर सोसायटीमध्ये पोहोचले,

सदर सोसायटीच्या लिफ्टमध्ये पथकाला काही रक्ताचे डाग आढळून आले .परिणामी संशया आणखी बळावला सोसायटीतील फ्लॅट नंबर ३०३शोधून काढले .पथकाला घरात एक विधी संघर्षित बालक आढळून आला .महिला पोलीस शिपाई हिच्या समक्ष विधी संघर्ष बालकांस विश्वासात घेऊन मयताचा फोटो दाखवला व तिच्याकडे विचारपूस केली असता खरी माहिती पुढे आली.
मयत बालाजी उर्फ बाळू लांडे हा त्यांच्या नात्यातील असून तो तिच्या आईला दारू पिऊन घरी येऊन त्रास देत होता या कारणावरून संबंधित विधी संघर्षित बालकाच्या आईने व तिचे ०४ साथीदार यांनी मारहाण केले .यामध्ये मयत बालाजी उर्फ बाळू लांडे यांचा खून झाला असल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.
सदर संशयित आरोपीचे मोबाईल नंबर व तांत्रिक विश्लेषण करून आरोपी दिनेश उपादे व आदित्य शिंदे यांना पथकाने ताब्यात घेतले तसेच इतर तीन साथीदारांचा शोध घेण्यासाठी बीड जिल्हा येथे एक टीम रवाना करण्यात आली आहे .पुढील कारवाईसाठी आरोपीना संत तुकाराम नगर पोलिसाकडे हजर केले आहे त्यांना ०४ दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनायक कुमार चौबे ,सह आयुक्त डॉ.शशिकांत महावरकर ,अप्पर पोलिस आयुक्त वसंत परदेशी ,उपायुक्त संदीप डोईफोडे ,सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ.विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने ,उपनिरीक्षक अशोक जगताप ,सहाय्यक पोलीस फौजदार पी.पी.तापकीर ,एस .एन .ठोकळ ,वि. एच.जगदाळे .ए.पी गायकवाड ,पोलीस अंमलदार जी.एस.मेदगे ,तांत्रिक विश्लेषण विभाग जी.डी.चव्हाण ,एस. डी.चौधरी ,एस .पी .बाबा .एन .बी .गेंगजे.वी.डी. तलेवार ,दळवी वी.एन.वेळापुरे,एस.टी.कदम ,टी.ई.शेख ,आर.के .मोहिते ,महिला पोलीस शिपाई माने यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!