दरोडा व वाहनचोरी पथक १ ची दमदार कामगिरी ! पोलीस आयुक्तालयाच्या गेट समोरील पोलीसांच्या गाड्या चोरणा-या रेकॉर्डवरील आरोपीस ठोकल्या बेडया…
पंकेश जाधव संपादक 7020794626
दरोडा व वाहनचोरी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक ३१/०५/२०२४ रोजी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी, सोबत पथकाकडील दुय्यम अधिकारी श्रेणी. पोलीस उप निरीक्षक व स्टाफ पोलीस हवालदार धनंजय ताजणे, चंद्रकांत जाधव, गणेश ढगे, पोलीस नाईक रविंद्र लोखंडे तसेच पोलीस अंमलदार श्रीकांत दगडे, सुमित ताकपेरे, महेश पाटील, शिवाजी सातपुते असे दिनांक १३/०५/२०२४ रोजी दाखल असलेल्या बंडगार्डन पोलीस स्टेशन, गुन्हा रजि नं १३३/२०२४, भादंवि कलम ३७९ या गुन्ह्यातील मोटार सायकल व आरोपी याचा सी.सी.टि.व्ही. फुटेज, आरोपीचे नातेवाईक यांचे मोबाईल नंबरचे तांत्रिक तपासाव्दारे शोध घेत असताना, समर्थ पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये मोटार सायकल चोरीतील रेकॉर्डवरील आरोपी नामे विष्णु भाऊराव कुंडगीर, वय २५ वर्षे, रा. सध्या पुणे फिरस्ता व मुळगाव खेर्डा, तालुका उदगीर, जिल्हा लातुर हा त्याचे ताब्यात हिरो होंडा स्प्लेंन्डर मोटार सायकलसह मिळुन आला. त्याचेकडे चौकशी केली असता त्याने ती मोटार सायकल ही पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे गेट नं ०३ चे बाहेरील असलेल्या सार्वजनिक रोडचे पार्किंग मधुन चोरी केल्याचे सांगितले. त्याप्रमाणे त्यास ताब्यात घेवुन त्याचेकडे तपास केला असता त्याने आणखी मोटार सायकली चोरी केल्याचे सांगितले आहे. त्याचेकडुन खालील नमुद पोलीस स्टेशनकडील वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.
१) बंडगार्डन पोलीस स्टेशन, गुन्हा रजि नं १३३/२०२४, भादंवि कलम ३७९
२) बंडगार्डन पोलीस स्टेशन, गुन्हा रजि नं १४०/२०२४, भादंवि कलम ३७९
३) हडपसर पोलीस स्टेशन, गुन्हा /२०२४, भादंवि कलम ३७९ रजि नं ८६०/२०२४, भादंवि कलम ३७९
४) भोसरी पोलीस स्टेशन, पिंपरी-चिंचवड आयुक्तालय, गुन्हा रजि नं २८४/२०२४, भादंवि कलम ३७९
अशा एकुण ९०,०००/-रु किं च्या एकुण ०४ मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
सदर आरोपीची वाहनचोरीचे गुन्हे करण्याची पध्दत हिरो होंडा स्प्लेंन्डर गाडयांचे हॅन्डल लॉक हे बनावट चावीचा वापर करुन स्विच ऑन करुन त्या चोरी करुन घेवुन जात होता व त्यातील पेट्रोल संपल्यानंतर ती गाडी सदर ठिकाणी सोडुन तेथील दुसरी मोटार सायकल चोरी करुन घेवुन जात होता. तसेच सदरच्या मोटार सायकली ह्या केडगाव रेल्वे स्टेशन जवळ, तालुका दौंड व फुरसुंगी येथील सार्वजनिक पार्किंगच्या ठिकाणी त्या लावल्या होत्या.
तसेच त्याचेवर सन २०१८ पासुन रेकॉर्डवरील यापुर्वीचे गुन्हे :-
१) समर्थ पोलीस स्टेशन ०२
२) बंडगार्डन पोलीस स्टेशन ०१
३) चंदननगर पोलीस स्टेशन ०१
४) हडपसर पोलीस स्टेशन ०५
५) पुणे लोहमार्ग पोलीस स्टेशन ०६
असे एकुण १५ वाहनचोरी गुन्हे दाखल आहेत.
यातील ०३ गुन्हे शाबित झाले असुन त्याची शिक्षा भोगुन तो दिनांक १९/०१/२०२४ रोजी पासुन बाहेर आहे.सदर आरोपीची वैद्यकीय तपासणी करुन पुढील कायदेशीर कारवाईकामी बंडगार्डन पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. शैलेश बलकवडे साो, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे श्री. अमोल झेंडे साो, मा. सहा. पोलीस आयुक्त साो, गुन्हे १ श्री. सुनिल तांबे, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक चे प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगराव पवार यांचे मार्गदर्शनाखाली श्रेणी. पोलीस उप निरीक्षक शाहीद शेख, पोलीस अंमलदार चंद्रकांत जाधव, धनंजय ताजणे, गणेश ढगे, बाळु गायकवाड, प्रदीप राठोड, रविंद्र लोखंडे, श्रीकांत दगडे, सुमित ताकपेरे, शिवाजी सातपुते, महेश पाटील, साईकुमार कारके व नारायण बनकर यांनी केली.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

