ख्रिश्चन लीडर्स प्रेयर फेलोशिप (CLPF) ख्रिसमस फेस्टिव्हल २०२५ – भव्य, शिस्तबद्ध आणि आशीर्वादित सोहळा
डॅनियल अँथनी उप संपादक पश्चिम महाराष्ट्र
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- ख्रिश्चन लीडर्स प्रेयर फेलोशिप (CLPF) तर्फे गुरुवार, ४ डिसेंबर २०२५ रोजी पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे ख्रिसमस फेस्टिव्हल २०२५ चे भव्य आयोजन करण्यात आले. सी एल पी एफ कोअर कमिटीने कार्यक्रमाची उत्कृष्ट आखणी आणि शिस्तबद्ध व्यवस्थापन केले. संपूर्ण सभागृह ख्रिस्ती बांधवांनी खचाखच भरले होते, ज्यावरून कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरल्याचे स्पष्ट झाले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमित त्रिभुवन यांनी अतिशय हृदयस्पर्शी, प्रभावी आणि भक्तिमय पद्धतीने केले. त्यांच्या निवेदनशैलीमुळे संपूर्ण कार्यक्रम अधिक अर्थपूर्ण आणि जोडून ठेवणारा ठरला.
पिंपरी–चिंचवड परिसरातील बहुसंख्य पाळकवर्ग व त्यांच्या मंडळींनी उत्साहाने सहभाग घेतला. सुमारे २५ चर्चेसकडून स्तुतिगीत, नृत्य, नाटिका अशा विविध कलाप्रकारांचे सादरीकरण झाले, ज्याला उपस्थित प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.
घोरपडी, पुणे येथील पास्टर राजू थॉमस यांनी पवित्र बायबलमधून देवाचे वचन प्रेरणादायी पद्धतीने मांडले. तसेच समुदायातील उल्लेखनीय उद्योजकांचा स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. सन्मानित उद्योजकांमध्ये विश्वास दळवी, शिरीष हिवाळे, नितीन काळे, प्रशांत बनकर, कुशल सोज्वळ यांचा समावेश होता.
याच कार्यक्रमात पुणे ख्रिश्चन फोरमचे अध्यक्ष पास्टर राजेश केळकर यांना ख्रिस्ती समुदायात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी सी एल पी एफ तर्फे “ख्रिस्ती समाज भूषण पुरस्कार” प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमातील एक विशेष आकर्षण म्हणजे सर्व धर्मगुरूंनी एकत्र येऊन सादर केलेले सुंदर ख्रिसमस स्तुतिगीत, ज्याने वातावरण अधिक आध्यात्मिक आणि आनंदमय केले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन
पास्टर डॅनियल अँथनी, पास्टर प्रकाश नानिवडेकर, पास्टर वरप्रसाद मार्क, पास्टर राजू मणिकम, पास्टर भास्कर साबळे, पास्टर सुनील सांगळे, पास्टर अभिषेक शुक्ला, पास्टर पंकज लालझरे, पास्टर जोसेफ हातागळे, पास्टर स्नेहल डोंगरदिवे, पास्टर नितीन गायकवाड, पास्टर राम धोत्रे यांनी केले
एकूणच कार्यक्रम अत्यंत आशीर्वादित, सुयशस्वी ठरला असून उपस्थित सर्वांनी त्याचे मनापासून कौतुक केले.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

