शिक्षा भोगून जामिनावर बाहेर आलेल्या आरोपी कडून चोरीस गेलेला माल हस्तगत


पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626
बिबवेवाडी पोलिस स्टेशन पुणे शहर
महा पोलिस न्यूज  ! ऑनलाईन पुणे:- सदरबाबत अधिक माहिती अशी की, दि. १०/१०/२०२५ रोजी महिला नामे शित्तल कमलेश साळसकर, वय ५५ वर्षे, व्यवसाय गृहिणी, रा. मौ. शारदा क्लिनीक समीर विश्व जिम जवळ, सोनवणे बिल्डिंग प्लट न. २०२ सुखसागरनगर कात्रज पुणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांची गाडी चोरीस गेलेबाबत बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. २४३/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(३) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
तपास पथकातील पोलीस अंमलदार आशिष गायकवाड व विशाल जाधव असे बिबवेवाडी पोलीस स्टेशन येथे कर्तव्यावर हजर असताना त्यांना त्याचे गुप्त बातमिदारामार्फत बातमी मिळाली की १६ एकर
मोकळ्या मैदानात एक इसम चोरीची गाडी घेवून थांबलेला असून त्याने अंगात लाईनिंगचा पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेला आहे. तसेच त्याच्याजवळील गाडीची हेडलाईट तुटलेली आहे.” वगैरे मजकुरची बातमी मिळताच मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते व पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरण बेद्रे, तपास पथकातील अधिकारी पोलीस उप निरीक्षक अमोल माने यांचे आदेशाने तपास पथकातील अमलवार आशिष गायकवाड, विशाल जाधव, सुमित ताकपेरे, शिवाजी येवले, ज्योतिष काळे यांनी मिळालेल्या बातमीनुसार सदर ठिकाणी जावून बातनिप्रमाणे खात्री केली असता वरील वर्णनाच्या इसमाने उडवाउडवीची उत्तरे दिली. तरी अधिक चौकशी केली असता नमुद इसम रेकॉर्डवरील आरोपी असल्याची माहिती मिळालेने संवर रेकॉर्डवरील आरोपी नामे बाळू प्रभाकर चव्हाण, वय ३८ वर्षे, रा. सदाशिव बाळ, कान्या मार्केट, जुन्नर एस.टी. स्टॅन्ड समोर, पुणे याने भौज मजेसाठी व पैश्यासाठी दुचाकी मोटारसायकल चोरलेबायत सांगितलेने त्याचेकडून बिबवेवाडी पोलीस स्टेशन गु.र.नं. २४३श२०२५ मधील मोटारसायकल जागीच हस्तगत करणेत आली आहे. सदर आरोपीकडे कसून चौकशी करता त्याने जेजूरी पोलीस ठाणे हद्दीमधून दोन मोटारसायकल व १० मोबाईल चोरी केल्याचे तसेच बिबवेवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि.नं. २२३/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३३९ (४), ३०५ मधील घरफोडी केल्याचे आहे. सदर आरोपीकडून बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. २४३/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), तसेच गुन्हा रजि. नं. २२३/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३३१ (४) ३०५ तसेच जेजूरी पोलीरा स्टेशन गुमहा रजि.नं. ३७४/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हे उघडकीस आणून त्याचेकडून एकूण १,८०,०००/- रु. या मुद्देमाल हस्तगत करणेत आला आहे. सदर आरोपीकडे मिळून आलेल्या एका स्प्लेंडर गाडीबाबत व १० मोबाईलबाबत अधिक तपास करत आहोत.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार सो, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, परिमंडळ ५ पूर्ण शहर, पोलीस उपआयुक्त (गुनो) निखील पिंगळे, सहा पोलीस आयुक्त ममता देसाई यामी विमान शहर, सहा. पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्ष सातपुते, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरज बेंद्रे, तपास पथक अधिकारी पोलीस उपनिरी मोलीस हवालदार संजय गायकवाड, विनोद जाधव, संजय आहे, पोलीस अमलवार शिवाय विशाल जाधव, सुमित ताकपेरे, ज्योतिष काळे, शिवाजी येवले पाहिल काळे संतोष बनसोडे दत्ता शेदंरे राहूल खाडे यांनी केली आहे.
I

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!