महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक म्हणून सदानंद दाते (IPS) यांची नियुक्ती
पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन मुंबई: भारतीय पोलीस सेवेतील (IPS) वरिष्ठ अधिकारी मा. श्री. सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या नवे पोलीस महासंचालक (DGP) पदी नियुक्ती करण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण नियुक्तीबद्दल राज्यभरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
महा पोलीस न्यूज तर्फे प्रसिद्धीस दिलेल्या संदेशात म्हटले आहे की, “आदरणीय (IPS) मा. श्री. सदानंद दाते यांची महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! साहेब, तुमच्या अनुभवी नेतृत्वाखाली महाराष्ट्र पोलीस दल अधिक सक्षम, कार्यक्षम आणि लोकाभिमुख होईल, अशी आम्हाला आशा आहे.”
श्री. सदानंद दाते हे त्यांच्या कर्तव्यनिष्ठेसाठी आणि प्रभावी कार्यशैलीसाठी ओळखले जातात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील पोलीस दलाला एक नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

