नर्तकीवरती पैसे खर्च करण्यासाठी चोरी करणाऱ्या आरोपीकडून ६,१४,४२० रुपये किमतीचे ०५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने फुरसुंगी पोलीसांकडून जप्त
प्रमोद बापू सावंत पुणे ग्रामीण ब्युरो चीफ
फुरसुंगी पोलीस स्टेशन पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे:- फुरसुंगी पोलीस स्टेशन गु र नं फुरसुंगी पो स्टे गु. र. नं. ४०३/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०५, ३३१(३), ३३१ (४) प्रमाणे फिर्यादी अभिजित मधुकर पठारे रा. होळकरवाडी, हवेली, पुणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल आहे. दि. ०३/१२/२०२५ रोजी दाखल गुन्हयातील अज्ञात आरोपी व चोरीस गेले मुद्देमालाचा तपास पथकातील अधिकारी व पोलीस अंमलदार असे शोध घेत असताना पोलीस हवालदार ६४९३ सागर वणवे व पोलीस अंमलदार ९२२० अभिजित टिळेकर यांना गोपनिय बातमीदाराकडून बातमी मिळाली की, इसम नामे राहुल उत्तम पठारे वय ३९ वर्षे, रा. होळकरवाडी, ता. हवेली, जि. पुणे याने गुन्हयातील चोरी केलेले काही सोने महंमदवाडी, पुणे येथील एका ज्वेलर्स मध्ये विक्री केले आहे, अशी बातमी मिळालेने सदर बातमी मा. वरिष्ठांना सांगून इसम नामे राहुल उत्तम पठारे याचा त्याचे राहते घराचे पत्त्यावर जावून शोध घेतला असता तो मिळून आला. आरोपीस फुरसुंगी पोलीस स्टेशन येथे घेवून येवून त्याचेकडे दाखल गुन्हयाचे अनुषंगाने तपास केला असता त्याने गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. चोरी करण्याचे उद्देशाबाबत आरोपीकडे तपास केला असता त्याने सांगीतले की, त्यास नर्तकी सोबतचे बैठकीचा व नाचगाण्याचा शौक असल्याने त्यासाठी पैसे खर्च करण्यासाठी जवळ पैसे नसल्याने त्याने चोरी केली आहे. सदर गुन्हयातील चोरी केलेल्या मुद्देमालाबाबत विचारणा केली असता त्याने चोरी केलेल्या मुद्देमालातील काही सोने महंमदवाडी, पुणे येथील एका सोनारास विक्री करून त्यापोटी आलेली ३०,०००/- रुपये रक्कम स्वतावरती खर्च केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीने विकलेले सोने व उर्वरीत सोन्याचे दागिने असे एकुण ६,१४,४२० रुपये किमतीचे ०५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने गुन्हयाचे पुरावेकामी जप्त करण्यात आले आहे, पोलीसांचे कामगिरीचे फिर्यादी अभिजित पठारे व स्थानिकांनी समाधान व्यक्त केले आहे. दाखल गुन्हयाचा पुढील तपास विष्णु देशमुख पोलीस उपनिरीक्षक हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करित आहेत.
सदरची उल्लेखनीय कामगीरी मा. डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-५. मा. श्रीमती अनुराधा उदमले सहा. पोलीस आयुक्त हडपसर विभाग, मा. अमोल मोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मा. राजेश खांडे पोलीस निरीक्षक (गुन्हे), फुरसुंगी पोलीस स्टेशन यांचे मार्गदशनाखाली तपास पथकातील अधिकारी पोउपनि विष्णु देशमुख, महेश नलवडे यांचे सोबत पोहवा / नितीन गायकवाड, सागर वणवे, श्रीनाथ जाधव, हरीदास कदम, सतिश काळे, महेश उबाळे, पो. कॉ. अभिजित टिळेकर, बिभिषण कुंटेवाड, वैभय भोसले यांचे पथकाने केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

