लोणी काळभोर पोलीसांनी अवैधरित्या दारुची वाहतुक करणाऱ्यास ठोकल्या बेडया
प्रमोद बापू सावंत पुणे प्रतिनिधी
लोणी काळभोर पोलिस पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक १०/११/२०२५ रोजी १३/०० वा. चे सुमारास थेऊर फाटा ते केसनंद रोडचे दिशेने एक पांढऱ्या रंगाचा महेंद्रा पिकअप टेम्पो चालला असून त्यामध्ये गावठी हातभट्टीचे कॅन भरलेले असल्याची बातमी लोणी काळभोर पोलीसांना प्राप्त झाली. त्यावर लागलीच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र पन्हाळे यांनी थेऊर पोलीस चौकीस नेमणुकीस असलेले पोलीस उप निरीक्षक श्री रत्नदिप बिराजदार, पोलीस उप निरीक्षक श्री दिगंबर सोनटक्के, पोलीस हवा. श्री दिगंबर जगताप व पोलीस शिपाई अमोल जाधव यांना बातमीप्रमाणे खात्री करुन कारवाई करणेकरीता रवाना केले.
सदर कारवाई करीता नेमणेत आलेले वरिल नमुद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी प्राप्त बातमीनुसार खात्री करुन चिंतामणी हायस्कुल थेऊर चौक येथे सापळा रचुन १३/४५ वा. चे सुमारास एक संशयीत पांढऱ्या रंगाचा महेंद्रा पिकअप टेम्पो नं. एम एच १२ एम व्ही ५०१७ हे चारचाकी वाहन ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. परंतु वाहन चालकाने पिकअप न थांबवता अतिशय भरधाव वेगाने पुढे नेला. त्यावर लोणी काळभोर पोलीसांनी सदर वाहनाचा दुचाकी वरुन पाठलाग करुन थेऊर स्मशानभूमी जवळ १३/५० वा. वाहनास ताब्यात घेतले. सदर वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये लाकडी भुश्याची पांढरी पोते भरलेले व त्यामध्ये काळया, निळया व पिवळ्या रंगाचे प्लास्टीकचे बरेच कॅन दिसून आले. सदर कॅन घी तपासणी केली असता त्यामध्ये गावठी हतभट्टी दारु असल्याचे पोलीसांचे निदर्शनास आले.
सदर वाहनामध्ये वाहन चालक नामे सोमनाथ सुरेश राखपसरे वय-२९ वर्षे रा. मु पो दहीटणे ता. दौंड जि. पुणे याचे ताब्यात एकुण २,१०,०००/- रु किं. ची २१०० लिटर तयार गावठी हातभट्टी दारु मिळुन आली. सदर दारु व त्याचे ताब्यातील पिकअप टेम्पो असा एकुण १०,१०,०००/- रु. चा मुद्देमाल लोणी काळभोर पोलीसांनी पंचांसमक्ष पंचनाम्याने जप्त केला आहे. सदर हातभट्टी दारु कोठुन आणली याबाबत वाहन चालकाकडे पोलीसांनी तपास केला असता सदर दारु त्याने गणेश चव्हाण रा. सोरतापवाडी ता. हवेली जि पुणे याचे सोरतापवाडी येथील दारुचे हातभट्टीवरुन आणली असल्याचे सांगितले आहे. त्याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाणेस गु. र. नं. /२०२५ महाराष्ट्र प्रोव्हिबिशन अॅक्ट कलम ६५ (क) प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आलेला आहे.
सदरची उत्कृष्ठ कामगीरी मा. डॉ. राजकुमार शिंदे सो. पोलीस उप-आयुक्त परि-०५ पुणे शहर, मा. सी. अनुराधा उदमले, सहा पोलीस आयुक्त हडपसर विभाग पुणे शहर, लोणी काळभोर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक गुन्हे श्रीमती स्मिता पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक श्री रत्नदिप बिराजदार, पोलीस उप निरीक्षक श्री दिगंबर सोनटक्के, पोलीस हवालदार श्री दिगंबर जगताप, पोलीस शिपाई श्री अमोल जाधव यांनी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

