डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
पंकेश जाधव संपादक 7020794626
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न, डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नाना पेठ अहिल्या आश्रम येथील ग्राउंडवर भव्य फुल पीच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आमदार सुनील कांबळे, डीसीएम सोसायटी चे जनरल सेक्रेटरी विशाल शेवाळे, नुरुद्दीन सोमजी, सामाजिक कार्यकर्ते इंद्रजीत सकट, यांच्या हस्ते करण्यात आले होते,
या क्रिकेट स्पर्धेमध्ये सुमारे 12 संघांनी सहभागी झाले होते, या क्रिकेट स्पर्धेत गवळीवाडा संघाने प्रथम क्रमांक पटकाविला, द्वितीय क्रमांक शिव भवानी संघाने पटकवला, तृतीय क्रमांक एकता क्रिकेट संघाने पटकवला, या विजेता संघांना स्मृतिचिन्ह व अभिवादन चषक देऊन त्यांना गौरवण्यात आला या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन मंगेश रोकडे यांनी केले होते,
यावेळी प्रशांत शिंदे, विकी भिसे, कौस्तुभ वाघमारे, जयंत साळुंखे, अक्षय पवार, रोहन नुले, रुपेश खिलारे, हितेश काळोखे, बंटी काळे, विशाल पवार आ दि यावेळी उपस्थित होते, सूत्रसंचालन विशाल पवार यांनी केले

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

