कोंढवा पोलिस स्टेशन तपास पथकाची धडाकेबाज कामगीरी ! कोयत्याने जखमी करून पान टपरी फोडणाऱ्या आरोपीस केले जेरबंद….
पंकेश जाधव संपादक 7020794626
कोंढवा पोलिस स्टेशन पुणे शहर
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- कोंढवा पोलीस स्टेशन गु र न 508/2024 मधील पाहिजे आरोपींचा शोध घेणे कामी मा.संतोष सोनवणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक,कोंढवा पोलिस स्टेशन यांनी आदेशित केले असता. आज दि 08/05/2024 रोजी कोंढवा पोलिस स्टेशन गु र न 508/2024 भा द वि 324,427, आर्म ॲक्ट 4(25)मधील आरोपी हे अशरफ नगर कोंढवा येथे थांबले असेल बाबत पोलिस हवालदार अमोल हिरवे व पोलिस अम शशांक खाडे यांना त्यांचे बातमीदारा मार्फत माहिती मिळाली सदर ठिकाणी जाऊन त्यांना ताब्यात घेतले असता त्यातील आरोपी नामे 1) अमन रजमोहम्मद बागवान वय 20 वर्ष रा अश्रफनगर कोंढवा पुणे 2) मुसामा अब्दुल्हाशमी सलाम वय 22 वर्ष रा मोमीन पुरा, खडक पुणे 3) मास शब्बीर शेख वय 22 वर्ष रा मोमीन पुरा,खडक,पुणे यांनी सदर फिर्यादी यास कोयत्याने जखमी करून त्याचे पानटपरी चे नुकसान केलेबाबत कबुली दिली.
सदर कामगिरी मा. अमीतेश कुमार पोलिस आयुक्त, मा.मनोज पाटील अप्पर पोलिस आयुक्त,पूर्व प्रादेशिक विभाग, मा.ए राजा पोलिस उप आयुक्त,परिमंडळ 5, मा. गणेश इंगळे मा.सहा पोलिस आयुक्त वानवडी विभाग पुणे, मा. संतोष सोनवणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कोंढवा पोलिस स्टेशन, ,मा. मनसिंघ पाटील पोलिस निरीक्षक गुन्हे कोंढवा यांचे मार्गदर्शना खाली श्री लेखाजी शिंदे सहा पो निरी, श्री बालाजी डिगोले पोलिस उप नरीक्षक , पो हवा अमोल हिरवे, पोलिस हवा राहुल वंजारी,पो अम अभिजित रत्नपारखी, पो अम सुहास मोरे, पो अम थोरात,पो अम अक्षय शेडगे, पो अम गरुड,पो अम भोसले,पो अम विकास मरगळे,पो अम राहुल रासगे, पो अम शशांक खाडे कोंढवा पोलीस स्टेशन यांनी केलेली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

