५ दरोडेखारांना परंदवडी, सोमाटणे फाटा येथून हडपसर तपासपथकाकडून ७२ तासात अटक “


संपादक :- पंकेश जाधव 7020794626

हडपसर पोलिस स्टेशन पुणे शहर

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :-फिर्यादी ओमप्रकाश देशराज सिंग हे पिझ्झा ऑर्डर डिलेव्हरी करण्याकरीता जात असताना, व्हीएसआय मेन गेट, चारवाडा मांजरी या ठिकाणी आले असताना अनोळखी इसमांनी त्यांच्याजवळील लांब धारदार शस्त्राने फिर्यादी यांना धाक दाखवून त्यांचेकडील मोचाईल फोन व रोख ६६० रूपये जबरदस्तीने काढून घेतले. तसेच अनोळखी आरोपींनी दुसऱ्या घटनेत प्रथमेश परमेश्वर समुद्रे यांचे मोटर सायकलची तोडफोड करून, मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून घेवून त्यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली, तसेच जोरजोराने ओरडत परिसरातील दुचाकी व चारचाकी वाहनांची कोयत्याने तोडफोड करून परिसरामध्ये दहशत पसरवून निघून गेल्याने त्याबाचत हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं ४२९/२०२४ भा.दं.वि. कलम ३९५,३९२,३९४,४२७,५०४,३४, कलम ४(२५) आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१) (३) सह १३५ व क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ०३ व ०७ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

मा. पोलीस आयुक्त साो. पुणे शहर यांनी पुणे यांनी दाखल गुन्ह्याची दखल घेवून गुन्हा तात्काळ उघडकीस आणणेबाबत आदेशीत केले होते. मा. वरिष्टांनी दिलेल्या आदेशावरून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संतोष पांढरे यांनी तपास पथक अधिकारी / अंमलदार यांची बैटक घेवून तपासाचा आराखडा तयार केला. त्यानुसार आरोपी आलेल्या व गेलेल्या मार्गाचे सीसीटीव्ही फुटेज पडताळणी करण्यास सुरवात केली. सीसीटीव्ही आधारे आरोपींचे उपलब्ध फुटेज हे ओळख पटवण्याकरीता उपयुक्त ठरत नव्हते. त्यामुळे आरोपी आलेल्या मार्गाचे सुमारे १०० हून अधिक ठिकाणचे सीसीटीव्ही पडताळणी केली. त्यापरून हे बाहेरून घटनास्थळापर्यंत आल्याचे निष्पन्न झाले. तसेच आरोपी घटनास्थळापर्यत आलेल्या सुमारे १२ किमी मार्गाचे तांत्रिक विश्लेषण केले.

Advertisement

तपास पथक अधिकारी अर्जुन कुदळे, सहा पोलीस निरीक्षक, महेश कवळे, पोलीस अंमलदार सुशील लोणकर, संदीप राठोड, सचिन जाधव, प्रशांत दुधाळ, निखील पचार, प्रशांत टोणपे, अजित मदने, भगवान हंबर्डे, सचिन गोरखे, अमोल दणके, चंद्रकांत रेजीतवाड, अमित साखरे, कुंडलीक केसकर, रामदास जाधव यांचे पथकाने प्राप्त फुटेज च केलेले तांत्रिक माहीतीच्या आधाराने आरोपी हे सोमाटणे फाटा, मावळ, पुणे येथील असल्याची माहीती प्राप्त करून आरोपी नामे १) प्रेम सुरेश पाथरकर वय १९ वर्षे रा. श्री-२, प्लॅट नंचर- ७०२, एक्सेबीरिया, बेबेढोहळ सोमाटणे फाटा, ता. मावळ जि.पुणे. २) अमर उत्तम शिंदे वय २३ वर्षे रा.रुम नंबर-१०, पहिला मजला, परंदवडी ठाकरवाडी शेजारी ता. मावळ जि.पुणे. ३) राज नाथा भोते वय २१ वर्षे रा.लक्ष्मीबन समोर, ब्लू डार्क कंपनी जवळ, एच.पी. पेट्रोलपंपाजवळ, परंदवडी सोमाटणे फाटा ता. मावळ जि.पुणे. ४) रोहित रामा खंडागळे वय २१ रा. लिलाबाई भोते यांचे घराजवळ, संत तुकारामनगर परंदवडी पाण्याच्या टाकी जवळ ता. मावळ जि. पुणे. ५) संतोष तव्यप्पा जाधव वय २० वर्षे रा. बालाजीनगर पाण्याच्या टाकीजवळ, परंदवडी ता. मावळ जि. पुणे. हे सर्व मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेवुन हडपसर पोलीस स्टेशन येथे आणून त्यांचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी करता त्यांचा गुन्हयात सहभाग निष्पन्न झाल्याने तसेच गुन्हयाचे घटनास्थळी प्राप्त सीसीटीव्ही फुटेजमधील इसम हे हेच असल्याची खात्री झाल्याने तसेच त्यांनी पाच जणांनी आपसात संगणमत करुन सदरचा गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झाले. आरोपींकडून त्यांनी गुन्हा करताना वापर केलेल्या दोन दुचाकी, गुन्ह्यातील फोन तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली चार धारदार कोयते हे हस्तगत करण्यात आले आहेत. आरोपीविरुध्द यापूर्वी खुनाचा प्रयत्न, जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास महेश कवळे, पोलीस उप निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर हे करीत आहे.

सदरची कामगिरी ही श्री अमितेश कुमार, मा. पोलीस आयुक्त सारे पुणे शहर श्री. मनोज पाटील साो, अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग व मा. आर राजा साो, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली मा. अश्विनी राख मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, श्री. संतोष पांढरे साो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, सौ. मंगल मोढवे मॅडम, पोनि. (गुन्हे), उमेश गित्ते सो., पोनि. (गुन्हे), यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उप निरीक्षक महेश कवळे, पोलीस अंमलदार, सुशील लोणकर, संदीप राठोड, सचिन जाथय, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, अजित मदने, अमोल दणके, चंद्रकांत रेजीतवाड, सचिन गोरखे, अमित साखरे, कुंडलीक केसकर, रामदास जाधव, अमोल जाधव, प्रदीप क्षिरसागर, राजेंद्र करंजकर, चियज ढाकणे, यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!