पुण्यात भारी ! सिंहगडरोड पोलीस स्टेशनची कामगीरी…तीन आरोपी चे ताब्यातुन एक पिस्टल व दोन जिवंत काडतुसे केले जप्त


पंकेश जाधव संपादक 7020794626

सिंहगडरोड पोलीस स्टेशन, पुणे शहर

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- सिंहगडरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री, विजय कुंभार याचे आदेशाने पोलीस उपनिरीक्षक निकेतन निंबाळकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, व पोलीस स्टाप असे गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करीत असताना पोलीस उप-निरीक्षक निकेतन निंबाळकर यांना त्याचे खास बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, रायकरमळा, ढिगारा, धायरी पुणे येथे झाडाखाली तीन इसम गावठी पिस्टल घेवुन थांबलेले आहेत,

Advertisement

अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने सदरची बातमीप्रमाणे वरिष्ठांनी योग्य ती पुढील कारवाई करण्याचे आदेश दिल्याने सदर बातमीच्या ठिकाणी जावुन मिळालेल्या बातमी प्रमाणे खात्री करता सदर ठिकाणी बातमीतील वर्णनाचे तीन इसम उभे असल्याचे दिसले त्यांना चाहुल लागताच ते पळुन जाऊ लागल्याने पोलीस स्टापचे मदतीने त्यांचा पाठलाग करुन त्यांना काही अंतरावर पकडण्यात आले असुन त्याचेकडुन ५०,०००/-रुपये किंमतीचे लोखंडी धातूचे देशी बनावटीचे एक पिस्टल, व ५००/-रुपये किंमतीचे दोन जीवंत काडतुसे असा एकुण ५०,५००/-रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन आरोपी नामे १) नामदेव रामभाऊ ढेबे वय-२२ वर्षे रा. फ्लॅट नं.३०३ मेघराज कॉम्पलेक्स, सम्राट बाजारच्या शेजारील लेन, रायकरमळा धायरी पुणे २) आकाश मच्छिद्र कदम वय २३ वर्षे रा. खडक चौक, लोणारे वस्ती, अरुण गायकवाड यांच्या घराखाली पार्कीग मध्ये धायरी पुणे ३) जय संगमेश्वर दयाडे वय १९ वर्षे रा. फ्लॅट नं.२०२ शिवसृष्टी अर्पाटमेंट, काळुबाई चौक, रायकरमळा धायरी पुणे यांना दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त परीमंडळ-३. पुणे शहर श्री. संभाजी कदम, मा. सहा पोलीस आयुक्त, सिंहगडरोड विभाग पुणे शहर श्री. आप्पासाहेब शेवाळ, वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निकेतन निंबाळकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, पोलीस अंमलदार, सचिन गायकवाड, प्रकाश पाटील, राजु वेगरे, स्वप्निल मगर, विनायक मोहिते, मोहन मिसाळ, विजय विरणक योगेश उदमले यांचे पथकाने केली.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!