दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ ची धडाकेबाज कामगिरी !घरफोडी चोरीचे गुन्ह्यातील आरोपीस २४ तासात केले जेरबंद


पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर.

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :– दिनांक २४/०४/२०२५ रोजी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ चे प्रभारी अधिकारी वपोनि श्री. नंदकुमार बिडवई, सपोनि प्रविण काळुखे, पोहवा ६९७३ पठाण, पोहवा २०६१ राठोड, पोशि ८७४२ पाटील व घरफोडी पथकातील अंमलदार पोशि १२००१ खरात, पोशि ८३४७ तेलंगे, पोशि ८३३४ पठाण असे कोंढवा पोलीस स्टेशन, गुन्हा रजि नं ३३२/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम ३३१(३),३३१ (४),३०५ या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना स्टाफमधील घरफोडी पथकातील अंमलदार पोशि १२००१ खरात व पोशि ८३३४ पठाण यांनी सीसीटीव्ही फुटेज व त्यांचे बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीप्रमाणे त्यांनी इसम नामे फिरोज मोहम्मद शेख वय ४३ वर्षे रा. गल्ली नं १, अशरफनगर, कोंढवा, पुणे यास ताब्यात घेवुन त्याचेकडे दाखल गुन्ह्याचे अनुषंगाने अधिक तपास करता त्याने दाखल गुन्ह्याची कबुली दिल्याने त्याचे ताब्यातुन सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल हॅन्डसेट, घरफोडी चोरी करीता लागणारे साहित्य असा एकुण किं. रु. ८,८६,२००/- चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन त्यास पुढील कारवाईकरीता कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

Advertisement

सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री. रंजन शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. निखील पिंगळे, मा. सहा पोलीस आयुक्त गुन्हे १ श्री. गणेश इंगळे, मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे २, राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नंदकुमार बिडवई दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संदीपान पवार, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. प्रविण काळुखे व पोलीस अंमलदार जहांगिर पठाण, खरात, तेलंगे, इरफान पठाण, प्रदीप राठोड, गणेश ढगे, मनिषा पुकाळे, महेश पाटील, यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!