बाणेर भागात ५,५६,४००/-रु किंमतीचा ओझोकुश गांजा (हायड्रोफोनीक गांजा) हा अंमली पदार्थ केला जप्त



पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626

अंमली पदार्थ विरोधी पथक ०२, गुन्हे शाखा पुणे शहर

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि.१०/०४/२०२५ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक २. गुन्हे शाखा, पुणे शहर चे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक व स्टाफ असे बाणेर पोलीस स्टेशनचे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार आझाद पाटील यांना मिळालेले बातमीवरुन शिवशक्ती चौक, रीक्षा स्टॅन्ड जवळ, बाणेर, पुणे येथे सार्वजनिक रोडवर, सार्वजनिक ठिकाणी इसम नामे अर्जुन लिंगराज टोटिगर, वय २६ वर्षे, रा. बी/११०२, सुखवानी पॅनरोमा, सुसगांव, बाणेर, पुणे याच्या ताब्यात एकुण ५,५६,४००/- रू. किमतीचा त्यामध्ये ३,०५,४००/- रु. किमतीचा ३० ग्रॅम ५४० मिली ग्रॅम ओझोकुश गांजा (हायड्रोफोनीक गांजा) तसेच इतर ऐवज जप्त करून त्याचे विरुध्द बाणेर पोस्टे गु.र.नं.५४/२०२५, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २०(ब) (ii) (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमुद अटक आरोपी हा मार्केटींग आणि सेल्सचा पदवीधर असून सध्या तो खाजगी कंपनीमध्ये काम करीत आहे.

वरील नमुद कारवाई ही मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. निखील पिंगळे मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे. २. श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक २. गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस अंमलदार आझाद पाटील, प्रशांत बोमादंड्डी, साहिल शेख, रविंद्र रोकडे, संदिप जाधव, मयुर सुर्यवंशी, दिनेश बास्टेवाड यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!