खाकीला कलंक ! अमली पदार्थ विक्रेत्यांसोबत आर्थिक व्यवहार; पुणे पोलिस दलातील कर्मचारी नवनाथ शिंदे यांचे निलंबन..
पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- पुणे पोलिस दलातील कर्मचाऱ्याचे अमली पदार्थ विक्रेत्यासोबत संबंध असल्याचे समोर आले आहे. या पोलीस कर्मचाऱ्याकडून अवैध धंदे चालवण्यास प्रोत्साहन देत त्यांच्यासोबत आर्थिक व्यवहार केल्याचे उघडकीस आले आहे.
या प्रकरणात सदर पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणामुळे पुणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
पुणे शहरातील स्वारगेट पोलीस ठाण्यात कार्यरत नवनाथ कांताराम शिंदे असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार २० ऑगस्टला पुणे पोलिसांनी सहकारनगर पोलिस ठाण्याचा हद्दीत सुरू असलेल्या हद्दीत अवैध धंद्यावर कारवाई केली. दरम्यान, एका तरुणाकडून यावेळी ५ किलो गांजा मिळून आला होता. तसेच इतर ४ जणांवर अमली पदार्थांच्या विक्री प्रकरणी सहकार नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कारवाई करण्यापुर्वी पोलिसांना एक संदेश मिळाला होता.
पोलीस कर्मचाऱ्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न दरम्यान या प्रकरणातील चौकशीमध्ये स्वारगेट पोलीस ठाण्यातील नवनाथ शिंदे या कर्मचार्याचा सहभाग असल्याचे उघडकीस आले आहे. संबंधित पोलिस शिपाई हा ड्रग्स विक्री प्रकरणातील असलेल्या आरोपींना मदत करत असून सहकारनगर पोलीस स्टेशनचा कलेक्शनचे काम करतो. तसेच तो या गांजा व्यवसायात भागीदार असल्याचीही चर्चा आहे. अमली पदार्थांच्या व्यवसायात भागीदार असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे थेट NDPS नुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

