इस्टेट एजंट असल्याचे भासवुन प्रॉपर्टी विकत घेण्याचे बहाण्याने घरात घुसुन दागिणे व मोबाईल फोन चोरणारा चोरटा सहकारनगर पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचेकडुन जेरवंद


पंकेश जाधव संपादक 7020794626

सहकार नगर पोलिस स्टेशन पुणे शहर 

महा पोलिस न्युज ! ऑनलाईन पुणे:-दि. १३/०२/२०२४ रोजी सुभीत चव्हाण रा. सहकारनगर नं.१ पुणे यांना एक इसम तुमचे घर विकत घेण्यासाठी माझ्याकडे पार्टी असुन त्यांना घर पाहण्यासाठी घेवुन येत असल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांना दुपारी १२.३० या. ची वेळ दिली व कामासाठी निघुन गेले होते, काम आवरून साधारण दुपारी ०१.३० वा.चे सुमारास घरी आले असता खोलीत टेबलवर ठेवलेला दुसरा अॅपल कंपनीचा आयफोन मोबाईल फोन घेण्यासाठी गेले असता त्यांना मोबाईल फोन मिळुन आला नाही. त्यावेळी त्यांनी त्यांचे आईला गोवाईल मिळुन येत नाही असे विचारले त्यावेळी आईने एक इसम ११.३० या. चे सुमारास घरी आला होता, तो माझ्या शेजारी बसला व घर पाहुन येतो असे म्हणून आतील खोलीत गेला होता असे फिर्यादी यांना त्यांचे आईने सांगितले. त्यावेळी त्यांना आईच्या गळ्यात तीचे सोन्याचे मंगळसुत्र दिसले नाही त्याबाबत तीला विचारले असता तीने उशीखाली ठेवले होते असे सांगितले. त्यानंतर आईच्या उशाला ठेवलेले तीचे सोन्याचे मंगळसुत्र व आयफोन कंपनीचा मोबाईल फोन चोरून नेल्याची खात्री झाल्याने त्याबाबत सहकारनगर पोलीस ठाणे येथे गुरनं ६२/२०२४ भा.द.वि. कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.

Advertisement

सदर गुन्हयाचे तपासाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुरेंद्र माळाळे सहकारनगर पोलीस स्टेशन यांनी मार्गदर्शन व सुबना देवन तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना आदेश केल्याने सदर गुन्हयाचे अनुषंगाने वेगवेगळ्या भागातील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले त्यावरून पोलीस अंमलदार अमोल पवार व विशाल वाघ यांनी बातमीदारामार्फत बातमी मिळवली की सदर सोन्याचे मंगळसुत्र व आयफोन कंपनीचा मोबाईल फोन चोरनारा इसम हा उरुळी कांचन पुणे भागात आहे अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने पोलीस अंमलदार सागर सुतकर यांनी तांत्रिक विश्वनेशन करून सदर आरोपीचे ठावठिकाणा बाबत माहिती मिळवुन सदर माहिती सहकारनगर पोलीस स्टेशन कडिल वरिष्ठांना कळविली असता त्यांनी लागलीच पोलीस अंमलदार यांची टीम तयार करुन त्यांना सुचना व मार्गदर्शन करून बातमीचे ठिकाणी जावुन कारवाई करण्याचे तोंडी आदेश दिले त्यानुसार सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी बातमीचे ठिकाणी जावुन छापा टाकुन आरोपीस ताब्यात घेवुन नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव अनिल ज्ञानेश्वर मलठणकर वय ५८ वर्षे रा. चाळ नं.२३ घ नं.१७७, आंबेडकर शाळेसमोर, लक्ष्मीनगर पर्वती पुणे असे सांगितले त्याची झडती घेता त्याचे ताब्यातुन १०,०००/- रु किंमतीचा एक अॅप्पल कंपनीचा आयफोन ७ मॉडेलचा मोबाईल फोन य ३६,०००/- रु किंमतीचे एक सोन्याचे मंगळसुत्र असा एकुण ४६,०००/- रु किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन त्याच्याकडे सहकारनगर पोलीस ठाणे येथील गुरनं ६२/२०२४ भा.द.वि. कलम ३८० सदरचा गुन्हा उघड करण्यात आला आहे.

सदर आरोपीने अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे केले आहेत काय त्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुरेंद्र माळाळे सहकारनगर पोलीस स्टेशन हे अधिक तपास करीत आहेत.

सदरची कामगीरी मा. अपर पोलीस आयुक्त सोो पश्चिम प्रादेशीक विभाग श्री प्रविणकुमार पाटील सोो. पोलीस उपायुक्त परिमंडळ-२, श्रीमती स्मार्तना पाटील सोो, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग नंदिनी दग्यानी सोो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकाचे सहा पोउपनिरी बापु खुटवड, पोलिस हवालदार संजय गायकवाड ,पोलीस अंमलदार अगोल पवार, विशाल बाघ, सागर सुतकर, बजरंग प्यार, किरण कांबळे, महेश मंडलिक, निलेश शिवतारे, गवनाथ शिंद, सागर कुंभार यांनी केली आहे


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!