महापालिकेच्या मलनिस्सारण विभागातील कनिष्ठ अभियंता गणेश गीते याने भाजप कार्यकर्त्यावर रोखले पिस्तुल…


महापालिकेतील 10 कोटीचा ठेका मिळवण्यावरुन वाद, भाजप कार्यकर्त्यावर पिस्तूल रोखले…महापालिकेच्या मलनिस्सारण विभागातील कनिष्ठ अभियंत्यासह ( गणेश गीते दोघांवर गुन्हा दाखल

पंकेश जाधव संपादक 7020794626

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे : – पुणे महानगरपालिकेच्या मलनिस्सारण विभागातील ठेका मिळविण्याच्या वादातून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यावर पिस्तूल रोखून त्याला जीवे मारण्याची धमकी दिली . हा धक्कादायक प्रकार गंजपेठेत रविवारी (दि.21) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी पुणे महापालिकेच्या मलनिस्सारण विभागातील कनिष्ठ अभियंत्यासह त्याच्या भावाविरोधात खडक पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीसह वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते निर्मल मोतीलाल हरीहर (वय-36 रा. गंजपेठ, पुणे) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कनिष्ठ अभियंता गणेश राजेंद्र गिते (वय 37), त्याचा भाऊ महेश (वय 35, दोघे रा. किराड गल्ली, भवानी पेठ, पुणे) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 109, 352, 3(5) सह अॅट्रॉसीटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निर्मल हरिहर हे भाजप कार्यकर्ता असून महापालिकेत ठेकेदार आहेत. ते रविवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास बालेवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या भाजप महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनाला निघाले होते. गंज पेठेतील मंगल क्लब मित्र मंडळाजवळ थांबले होते. त्यावेळी हरिहर यांच्या ओळखीचे महापालिकेच्या मलनिस्सारण विभागातील कनिष्ठ अभियंता गणेश गिते व त्याचा भाऊ महेश गिते त्याठिकाणी आले.

गिते याने हरिहर यांच्या पोटाला पिस्टल लावले. हरिहर यांना जातीवाचक शिवीगाळ केली. ‘तू 10 कोटी रुपयांचे टेंडर भरतो काय? तुझी लायकी काय?’ असे म्हणून हरिहर यांना जीवे मारण्याची धमकी दिली, असे हरिहर यांनी खडक पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल्ल, सहायक पोलीस आयुक्त मच्छिंद्र खाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईगडे , पोलीस निरीक्षक गुन्हे संतोष खेतमाळस यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त मच्छिंद्र खाडे करीत आहेत.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!