निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जी विभाग, पुणे यांची सोरतापवाडी व परिसरात अषेध गावठी हातभट्टी दारू निर्मिती, विक्री, वाहतूक केंद्राचर धडक कारवाई.
पत्रकार :- विशाल धाकतोडे ( पुणे ग्रामीण )
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :– मा. अधीक्षक साहेब, राज्य उत्पादन शुल्क, पुणे यांचे आदेशानुसार दि. २८/०२/२०२४ रोजी मिळालेल्या गुप्त खात्रीलायक बातमीनुसार निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जी बिभाग, पुणे या विभागाने गुन्हा अन्वेषण विशेग मोहीम राबवून सोरतापवाडी, वडकी, वाघोली, ता. हवेली, जि. पुणे व नांदूर, ता. दाँड, जि. पुणे तसेच येथे अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मिती व विक्री केंद्रावर अचानक छापे घालून सदर कारवाई मध्ये रसायन ५३०० लि., गावठी हातभट्टी दारू ४२० लि., सरपण ४०० किलो, एक चारचाको मिनी टेम्पो व इतर अवैध हातभट्टी दारू निर्मितीचे व विक्रीचे साहित्य असा एकूण रु. ५,५५,५००/- मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, सदर कारवाईत हातभट्टी निर्मिती, विक्री व बाहतूक करणा-या इसमांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर गुन्ह्यांचा तपास निरीक्षक श्री. संजय कोल्हे, जी विभाग व दुय्यम निरीक्षक श्री. ए. ए. औटे, बी. जी. रेडेकर हे करीत आहेत.
सदरची कारवाई पुणे विभागाचे विभागीय उपायुक्त श्री. धोमकर साहेब व अधीक्षक श्री. रजपूत साहेब तसेच उपअधीक्षक, श्री. शिंदे साहेब, श्री, पाटील साहेब, श्री. जगदाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक श्री. संजय के, कोल्हे व दुय्यम निरीक्षक श्री. ए. ए. ओटे, श्री. बी. जी. रेडेकर, यांनी केली आहे. सदर कारवाईत सर्वश्री सहा. दु. नि. श्री. मोडक आणि जवान श्री. अमोल कांबळे, श्री. संतोष गायकवाड, श्री. दत्तात्रय आवनाषे व महिला जवान श्रीमती प्रिया चंदनशिवे यांनी सहभाग घेतला.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

