रामटेकडी येथे तरुणाचा दगडाने ठेचून खून ! दारूसाठी पैसे न दिल्याने झाला हा खून…
सलमान सय्यद पत्रकार पुणे शहर
वानवडी पोलिस स्टेशन पुणे शहर
महा पोलिस न्यूज़ ! ऑनलाईन पुणे :- पुणे शहरात दिवसेंदिवस घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांनी थैमान घातला आहे. आज दि. ९ रात्री उशिरा रामटेकडी येथे टोळक्याने दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून एका तरुणाचा सिमेंट ब्लॉक, दगडाने ठेचून खून केला. खुनाची माहिती मिळताच वानवडी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
खुन झाल्याचे कळताच रामटेकडी हडपसर परिसरात दहशत पसरली आहे. अल्पवयीन गुन्हेगारांच्या पालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी राजू शिवशरण यांच्या नातेवाईकांनी केली असून गुन्हे दाखल न झाल्यास वानवडी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढणार असल्याचे सूत्रांकडून समजते.
राजू शिरीष शिवशरण, अंदाजे वय ३५ असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. राजू शिवशरण हा देखील रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समजते. राजू शिवशरण व आरोपी यांच्यात पूर्ववैमनस्य असल्याचे देखील माहिती समोर येत आहे.
रात्री राजू शिवशरण रामटेकडी वंदेमातरम चौक येथून जात असताना अल्पवयीन आरोपींनी शिवशरण यांना दारू पिण्यासाठी पैसे मागितले परंतु राजू यांनी पैसे न दिल्याने अल्पवयीन गुन्हेगारांनी सिमेंट ब्लॉक, दगडाने शिवशरण यांच्यावर जीवघेणा हल्ला करून त्याचा खून केला

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

