झोमॅटो कंपनीची डिलीव्हरी करणा-या पिता पुत्रास रात्रीच्यावेळी मारहाण करुन लुटणा-या दरोडयाच्या गुन्हयातील गुन्हेगारांना गुन्हा घडल्या पासुन ४८ तासात सहकारनगर पोलीसांनी केली अटक


पंकेश जाधव संपादक 7020794626

सहकारनगर पोलीस स्टेशन पुणे शहर 

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- इसम नामे ओंकार हनुमंत कुंभारी वय २२ वर्ष रा. धनकवडी पुणे हे त्यांचे वडीलांसह झोमॅटो कंपनीत डिलीव्हरी बॉय म्हणुन नोकरी करतात, दिनांक ०९/०२/२०१४ रोजी रात्रौ ००.३० वा. ते वडीलांसह नवनाथनगर धनकवडी पुणे येथे बर्गरची डिलीव्हरी करण्यासाठी जात असताना त्यांना तीन इसमांनी तंबाखु मागण्याचा बहाणा करुन ओंकार कुंभारी यास लाईटचे टयुबचे नळीने मारुन जखमी करुन त्यांचा मोबाईल जबरदस्तीने काढुन चोरी केली होती. सदर बाबत ओंकार कुंभारी यांनी दि.१०/०२/२०२४ रोजी दिलेल्या तक्रारीवरुन सहकारनगर पोलीस स्टेशन गु.र.नं.४४/२०२४ भादवी. कलम ३९४,३४ अन्वये गुन्हा नोंद आहे.

Advertisement

दाखल गुन्हयाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुरेंद्र माळाळे सहकारनगर पोलीस स्टेशन पुणे यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशनकडील सहा पोलीस निरीक्षक सी.वी. बेरड, तपास पथकातील सहा. पोलीस उपनिरीक्षक बापु खुटवड व तपास पथकाचा स्टाफ करीत असताना पोलीस अंमलदार महेश मंडलीक व सागर कुंभार यांना बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा आरोपी नामे १) शंतनु मारूती लोहार वय १८ वर्षे रा. दुर्वाकुंर सोसायटी, दुसरा मजला फ्लॅट नं.१०, प्रभात चौक धनकवडी पुणे २) मंगेश ऊर्फ मंग्या हनुमंत चौरे वय २१ वर्षे रा. नवनाथ नगर, बालाजी किराना दुकानाजवळ, तापकीर यांची बिल्डींग, तीसरा मजला धनकवडी पुणे ३) अविष्कार ऊर्फ अव्या अशोक दिघे वय २२ वर्षे रा. रामदेव हाईट्स दुसरा मजला फ्लॅट नं.२०, गुलाबनगर धनकवडी पुणे यांनी केला असुन ते कात्रजकडुन नवले पुलाकडे जाणारे हायवे रोडवरील दत्तनगर जवळील सर्वीस रोडवर असलेल्या जयभवानी हॉटेल समोर एका नवीन विना नंबर प्लेटचे टिव्हीएस कंपनीचे एंन्टोर गाडीसह थांबले असुन ते कोठेतरी पळून जाण्याचे तयारीत आहेत, लागलीच तपास पथकाचे स्टाफने वरील तीन आरोपींना जयभवानी हॉटेल दत्तनगर येथुन ताब्यात घेवुन सहकारनगर पोलीस स्टेशन येथे आणुन तपास करता त्यांनी ओंकार कुंभारी यांना मारहाण करुन त्यांचा मोबाईल जबरदस्तीने काढुन घेतल्याची कबुली दिली. नमुद तीनही आरोपींना दाखल गुन्हयात अटक करण्यात आली असुन त्यांचेकडुन गुन्हयात वापरलेली १,१०,०००/-रुपये किमतीची टिव्हीएस कंपनीचे एंन्टोर दुचाकी गाडी व फिर्यादी ओंकार कुंभारी यांचा ७,०००/-रुपये किमतीचा असा एकुण १,१७,०००/- रुपये किमतीचा माल जप्त केला आहे. दाखल गुन्हयाचा पुढील तपास सहकारनगर पोलीस स्टेशन कडील पोलीस उपनिरीक्षक महेश नलावडे करीत आहेत. सदरचा गुन्हा ४८ तासाचे आत उघडकीस आला आहे.

सदर कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त दक्षिण विभाग श्री. प्रवीणकुमार पाटील सोो, परिमंडळ २ च्या पोलीस उपायुक्त श्रीमती स्मार्तना पाटील सोो, स्वारगेट विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती नंदीनी बग्यानी सो, सहकारनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुरेंद्र माळाळे यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक सी.बी. बेरड तपास पथकाचे सहा पोलीस उपनिरीक्षक बापु खुटवड, पोलीस हवालदार बजरंग पवार, संजय गायकवाड, अमोल पवार, निलेश शिवतरे, पोलीस अंमलदार महेश मंडलीक नवनाथ शिंदे, सागर कुंभार, सागर सुतकर, विशाल वाघ यांनी केलेली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!