पिंपरी चिंचवड अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाची धडक कारवाई ! प्रतिष्ठित स्पा सेंटरच्या आड पिंपळे सौदागर येथे सुरु होता वेश्या व्यवसाय.
सागर कसबे पुणे प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- The Aura Thai Spa ह्या स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा प्रकार गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने उघडकीस आणला. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 05 ईशान्य व 02 इतर राज्यातील अशा 07 (3 नागालँड,1 मिज़ोराम, 1 त्रिपुरा, 1 केरळ व 1 महाराष्ट्र) पीडित महिलांची सुटका केली आहे. स्पा सेंटरचा मालक अभिजित लोरन्स (३०, रा. रा पिंपळे सौदागर, मूळ रा. तिरुअनंतपुरम केरळ ) याचे विरुद्ध सांगवी पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता सह पिटा कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे.
पिंपळे सौदागर येथील रोस आईकॉन बिल्डिंग मधील शॉप नंबर 201 ते 204 येथे औरा स्पामध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने बनावट ग्राहक पाठवून शहानिशा करून तेथे छापा टाकून कारवाई केली. यावेळी पोलिसांनी सात महिलांची सुटका केली. स्पा मालक अभिजित लोरन्स याने महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्या व्यवसायास प्रवृत्त केल्याची माहिती उघडकीस आली आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त श्री सारंग आवाड, पोलीस उपायुक्त गुन्हे डॉ. शिवाजी पवार, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे 1 श्री विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री नितीन गिते, सपोनि श्री भास्कर पुल्ली व पथकाने केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

