भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीमधील गुजर निंबाळकर वाडी येथील खुनामध्ये नवा व्टिस्ट


पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626
भारती विद्यपीठ पोलीस स्टेशन, पुणे शहर
गुजर निंबाळकर वाडी येथील खुनामध्ये नवा व्टिस्ट, सोबतचे मित्रांनीच मयताचे भावाकडुन सुपारी घेवुन मयताचा केला घात, साक्षीदारच निघाला आरोपी, आणखीन ३ आरोपींना अटक
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :-  दिनांक १७/११/२०२५ रोजी खोपडेनगर, कात्रज, पुणे येथील लेबर कॅम्पचे मागील बाजुस मयत अजयकुमार गणेश पंडीत, वय २२ वर्षे, रा सध्या साईनगर, खोपडेनगर, कात्रज, पुणे मुळ गाव चत्रो, जिल्हा हजारीबाग, झारखंड याचेवर आरोपी नामे अशोक कैलास पंडीत, वय ३५ वर्षे, सध्या रा. यादववाडी मोसी, पुणे मुळ गाव. रा. गेडा बरखंट्टा, तहसील जिल्हा हजारीबाग, राज्य झारखंड याने त्याचे पत्नी सोबत अनैतिक संबंध असलेच्या कारणावरुन चाकुने वार करुन, जिवे ठार मारुन, त्याचा मृतदेह गोणीमध्ये भरून गुजर निंबाळकरवाडी, कात्रज, पुणे येथील डोंगरामध्ये पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने फेकून दिला आहे म्हणुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. ५१३/२०२५, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(१), २३८ अन्वये गुन्हा दाखल आहे. त्यामध्ये आरोपी अशोक कैलास पंडीत यास दिनांक २१/११/२०२५ रोजी अटक करण्यात आली आहे.
अटक आरोपी अशोक कैलास पंडीत यास भारती विद्यापीठ पोलीसांनी त्याचेकडे अधिक तपास केला असता त्याने त्याचे पत्नीचे मयत अजयकुमार पंडीत याचे सोबत अनैतिक संबंध असल्याचे रागातुन मयत अजयकुमारचे मित्र असलेले रणजितकुमार धनुखी यादव, कृष्णकुमार विजयमहतो वर्मा, सचिनकुमार शंकर पासवान यांना अजयकुमार पंडीत याचा खुन करण्याची रोख ४ लाख रुपयांची सुपारी देवुन त्यांचे मदत्तीने चाकुच्या सहाय्याने मयत अजयकुमार पंडीत यांचा खुन केला आहे. सदर बाब निष्पन्न होताच आरोपी १. कृष्णकुमार विजयमहतो वर्मा, वय २१ वर्षे, रा, साईनगरी, खोपडेनगर, लेबर कैम्प, कात्रज गुजरवाडी, पुणे, मुळ गाव गुमो बरवाडीह, पोस्ट ठाणा झुमरी तिलैया, झारखंड २. सचिनकुमार शंकर पासवान, वय २६ वर्षे, रा. लेबर कॅम्प, साईनगर, खोपडेनगर, कात्रज, पुणे मुळगाव घंगरी, पो. हरोडी, ठाणा, जयनगर, जि. कोडर्मा, झारखंड यांचा शोध घेत असताना ते पुणे रेल्वे स्टेशन येथुन मुंबईकडे जात असल्याची व तेथुन ते झारखंड येथे जाणार असल्याची माहीती मिळाली. नमुद आरोपींची त्याबाबतची माहीती घेवुन कर्जत, कल्याण व ठाणे रेल्वे पोलीस स्टेशन येथील प्रभारी अधिकारी व पोलीस स्टाफ यांना संपर्क करुन त्यांचे मदत्तीने नमुद दोन आरोपींना ठाणे रेल्वे पोलीस स्टेशन येथे ताब्यात घेतले. सदर आरोपींकडे तपास करुन त्यांना गुन्हयातील अटक आरोपी अशोक कैलास पंडीत याने त्यांना सुपारी स्वरुपात दिले रक्कमेपैकी ३,१२,०००/- रुपये रक्कमेसह अटक करण्यात आले आहे.
नमुद दोन्ही आरोपींकडे तपास करता त्यांनी त्यांचा सहकारी व गुन्हयात प्रथम साक्षीदार म्हणून पोलीसांचे समोर आलेला रणजितकुमार धनुखी यादव, वय ३० वर्षे, रा. सध्या साईनगर, खोपडेनगर, कात्रज, पुणे मुळ गाव चत्रो, जिल्हा हजारीबाग, झारखंड याचेसह गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास दिनांक २३/११/२०२५ रोजी अटक केली आहे.
सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहर श्री. राजेश बनसोडे, मा.पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, श्री. मिलींद मोहीते, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे श्री. राहुल आवारे, यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल खिलारे, सहा. पो. निरीक्षक स्वप्निल पाटील, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अमिनय चौधरी, तुकाराम सुतार, संदीप आगळे, सचिन सरपाले, नवनाथ भोसले, सागर बोरगे, महेश बारवकर, मंगेश पवार, मंगेश गायकवाड, किरण साबळे, निलेश खैरमोडे, अवधुत जमदाडे, महीला अंमलदार सोनाली पिलाणे यांच्या पथकाने केली आहे.

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!