वाकड पोलीस ठाणे तपास पथकाची दमदार कामगिरी ! ५ किलो १०० ग्रॅम २,५५,०००/- रु. किंमतीचा गांजा हा अंमली पदार्थ जप्त
अमोल कुंटे पुणे जिल्हा प्रतिनिधी
वाकड पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात ३१ डिसेंबरच्या अनुषंगाने अंमली पदार्थ खरेदी-विक्री करणाऱ्यांवर विशेष मोहिम राबवून कारवाई करणेबाबत मा. श्री. विनयकुमार चौबे साो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी आदेश दिले आहेत.त्याप्रमाणे दिनांक ३०/१२/२०२४ रोजी वाकड पोलीस ठाणेचे तपास पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना खात्रिशीर मिळालेल्या बातमीप्रमाणे साईश्री पान शॉप, प्रिस्टीन प्रोलाईफ सोसायटीचे जवळ, एम.एस.ई.वी. चौक, वाकड, पुणे येथे इसम नामे पुनितकुमार विवेक शेट्टी त्याचे कब्जात गांजा हा अंमली पदार्थ पान टपरीमधून विक्री करतो. मिळाले बातमीचा आशय वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाकड पोलीस ठाणे यांना कळवून त्यांचे मार्गदर्शनाप्रमाणे प्रिस्टीन प्रोलाईफ सोसायटीचे जवळील साईश्री पान शॉप येथे सापळा लावून छापा कारवाईमध्ये इसम नामे पुनितकुमार विवेक शेट्टी, वय ३२ वर्षे, रा. म्हातोबा नगर, माताजी मेडिकलचे जवळ, दत्तमंदिर रोड, वाकड, पुणे यास ताब्यात घेऊन त्याचे पान टपरीची झडती घेतली. सदर पान टपरीमध्ये ५ किलो १०० ग्रॅम २,५५,०००/- रुपये किंमतीचा गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला. रितसर कारवाई करुन जप्त करण्यात आला. इसम नामे पुनितकुमार विवेक शेट्टी याने गांजा हा अंमलीपदार्थ अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या कब्जात बाळगला म्हणून त्याचेविरुध्द वाकड पोलीस ठाणे येथे गु.र.नं. १३७३/२०२४, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून नमूद गुन्ह्यात आरोपीस दिनांक ३०/१२/२०२४ रोजी अटक करण्यात आली आहे. आरोपीची गुन्ह्याचेकामी दि. ०२/०१/२०१५ रोजीपर्यंत पोलीस कस्टडी मंजूर केली आहे. सदरचा गांजा कोठून आणला कोणास विक्री करणार होता याबाबत तपास चालू आहे.
सदरची कामगिरी मा. श्री. विनयकुमार चौबे साो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा.डॉ. शशीकांत महावस्कर, पोलीस सह आयुक्त, मा. श्री. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, श्री. विशाल गायकवाड सारे, पोलीस उप आयुक्त, परि-२, श्री. सुनिल कुराडे, सहा. पोलीस आयुक्त सारे, वाकड विभाग यांचे मार्गदर्शनाखली वाकड पोलीस ठाणेकडील निवृत्ती कोल्हटकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सपोनि, सुभाष चव्हाण, पोउपनि, अनिरुध्द सावर्डे, श्रेणी पोउपनि. विभीषण कन्हेरकर, पोलीस अंमलदार मारुती तरंगे, युसूफ बेग, वंदु गिरे, संदिप गवारी, नामदेव वडेकर, विजय घाडगे, विजय भुसारे, रामचंद्र तळपे, तात्यासाहेब शिंदे, सौदागर लामतुरे, ज्ञानदेव झेंडे, कोर्तेय खराडे, यांनी केली आहे. दाखल गुन्ह्याचा तपास सुभाष चव्हाण, सपोनि. हे करीत आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

