बंडगार्डन पोलीस स्टेशन तपास पथकाची कौशल्यपुर्ण कामगिरी ! घरफोडीच्या गुन्हयातील सराईत आरोपीच्या आवळल्या मुसक्या


इमरान शेख पुणे जिल्हा प्रतिनिधी 

बंडगार्डन पोलीस स्टेशन पुणे शहर 

महा पोलीस न्यूज़ ! ऑनलाईन पुणे :- बंगला नंबर २६ ओल्ड खान रोड, कॅम्प पुणे येथील राहते घरातील कपाटाचे लॉक तोडुन किंमत रुपये १५,०६,०००/-रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरीस गेले बाबत फिर्यादी नामे अजीज करीम मोलु वय ५९ वर्षे रा. सदर यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन बंडगार्डन पोली ठाणेस घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नमुद गुन्हा उघडकिस आणणे बाबत मा.श्रीमती स्मार्तना पाटील मॅडम, पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, यांनी तपास पथकाचे अधिकारी व पोलीस अंमलदार यांना सुचना देवुन मार्गदर्शन केले होते.

तपास पथकातील अधिकारी व अंमलदार दाखल गुन्हयाचा तपास करीत असताना पो.अं. प्रदिप शितोळे, ज्ञानेश्वर बडे, मनोज भोकरे यांना त्याचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की इस्कॉन मंदिराचे शेजारील मोकळया जागेत एक इमस संशयीतरित्या थांबलेला असुन त्याच्या हालचाली संशयीत वाटत आहेत अशी बातमी प्राप्त झाल्याने वरील स्टाफचे मदतीने सापळा लावुन शिताफीने पकडुन त्यास त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव आर्यन अजय माने वय २० वर्षे रा. भेकराईनगर, हडपसर, पुणे असे सांगितले असता त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यात परकिय चलन मिळुन आले त्याबाबत त्याचेकडे तपास करता त्याने व त्याचा मित्र दत्ता लंगडे असे दोघांनी कॅम्प परीसरातुन एका बंगल्यामधुन सोन्याचे दागिने व परकिय चलन चोरी केल्याचे सांगितल्याने त्या बाबत बंडगार्डन पो.स्टे. पुणे शहर गु.र.नं.३५९/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३३१(३),३३१ (४),३०५ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल असल्याने त्यास अटक करुन त्याचे कडुन सोन्याचे दागिने, एक केटीएम २०० मो. सायकल व रोख रक्कम असा एकुण ८,०२,५००/- रुपयेचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

तसेच खालील गुन्हे उघडकिस आणण्यात आले आहेत.
१) वानवडी पो.स्टे. गु.र.नं.५१२/२०२४ बी.एन.एस. ३११(२) (४),३०५ (अ) प्रमाणे

सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त सोो, पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा सोो, पोलीस सह. आयुक्त, पुणे शहर, मा. प्रविणकुमार पाटील सोो, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे, मा. श्रीमती स्मार्तना पाटील मॅडम, पोलीस उपआयुक्त परिमंडळ २, मा. दिपक निकम सोो, सहाय्यक पोलीस आयुक्त लष्कर विभाग, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र गायकवाड, मा. पोलीस निरीक्षक (गुन्हे) संपतराव राऊत यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक स्वप्निल लोहार, मोहन काळे, प्रदिप शितोळे, प्रकाश आव्हाड, सारस साळवी, विष्णु सरवदे, ज्ञानेश्वर बडे, महेश जाधव, मनोज भोकरे शिवाजी सरक, यांचे पथकाने केली आहे. तसेच गुन्हे शाखा अंगुलीमुद्राचे सपोनि संदिप बेले व त्यांचे टिमचे सहकार्य लाभले आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!