पोलिसांना घरभाडे देण्याचा आदेश बासनात ‘मॅट’च्या निर्णयाची अंमलबजावणी नाहीच…


पंकेश जाधव संपादक 7020794626

महा पोलिस न्यूज़ ! ऑनलाईन पुणे :- पुणे पोलिस आयुक्तालयातील १३० पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना एक जुलैपासून वेतनातून घरभाडे भत्ता देण्यात यावा, असे मॅट कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणीत दिरंगाई होत असल्यामुळे पोलिसांत अस्वस्थता आहे.

कुटुंबातील सदस्य संख्या जादा, उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या अभ्यासाला आवश्यक वातावरणाचा अभाव, आजारी, वृद्ध आई-वडील, अशा अनेक समस्यांमुळे पोलिस वसाहतीत म्हणजेच शासकीय निवासस्थानात न राहणाऱ्या पुणे पोलिस आयुक्तालयातील कर्मचाऱ्यांना गेली वर्षभर वेतनातून मिळणारे घरभाडे न मिळाल्यामुळे पोलिस आर्थिक संकटात होते.वेतनातून मिळणारे घरभाडे वर्षभर न मिळाल्यामुळे मुलांना उच्च शिक्षण देण्यासाठी कर्जबाजारी झालेल्या बहुतांश पोलिस कर्मचाऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. पोलिस वसाहतीत राहिल्यास घरभाडे हा मुद्दा राहत नाही. मात्र, पोलिस वसाहतीतील घरं आकाराने लहान असल्या कारणाने वसाहतीबाहेर भाडेतत्त्वावर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना श्रेणीनुसार दहा ते चौदा हजार रुपये घरभाडे वेतनातून मिळत होते. अनेकांना सहा महिने, वर्षभर वेतनातून मिळणारे घरभाडे मिळालेले नव्हते. काही कर्मचाऱ्यांना दीड वर्ष घरभाडे मिळालेले नव्हते.

Advertisement

घरभाड्याशिवाय मिळणाऱ्या वेतनात कुटुंब चालवणं आजच्या महागाईच्या काळात अशक्य असताना हातात पडणाऱ्या वेतनातून घरभाडे देण्याची नामुष्की कर्मचाऱ्यांवर आली आहे. परिणामी तब्बल साडेतीनशे पोलिस कर्मचारी आर्थिक संकटाचा सामना करत होते. वाढत जात असलेल्या आर्थिक विवंचनेमुळे या पोलिसांचे मानसिक संतुलन बिघडत चालले होते. या पार्श्वभूमीवर पोलिस मॅट कोर्टात गेले होते. एक जुलै २०२४ पासून घरभाडे भत्ता वेतनातून देण्याचा आदेश मॅट कोर्टाने २ जूनला दिला. मॅट कोर्टाच्या आदेशाला दीड महिना होऊनही अंमलबजावणी झाली नाही.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!