अंमली पदार्थ विरोधी पथक. २ गुन्हे शाखेची चंदननगर, येरवडा पोलीस ठाणे हद्दीत कारवाई १७,०८,५५५/- रू किंचा गुटखा हा तंबाखुजन्य पदार्थ तसेच गांजा असा अंमली पदार्थ जप्त


पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626
अंमली पदार्थ विरोधी पद. २ गुन्हे शाखा 

चंदननगर पोलीस स्टेशन

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे  :- दि.०९/१०/२०२५ रोजी वरिष्ठांचे आदेशान्वये अंमली पदार्थ विरोधी मोहिम राबवित असताना अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा, पुणे शहर चे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक व स्टाफ असे चंदननगर पोलीस स्टेशनचे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना प्लॅट नं ए/६ पिनाक सोसायटी, सोपाननगर, वडगांव शेरी पुणे येथे आरोपी नामे १) श्रवण हनुमाराम गेहलोत, वय ३५ वर्षे, रा. प्लॅट नं ए/६ पिनाक सोसायटी, वडगांव शेरी पुणे २) लाबुराम पकाराम देवासी, वय २५ वर्षे रा प्लॅट नं ए/६ पिनाक सोसायटी, वडगांव शेरी पुणे ३) दिनेशकुमार आचलाराम प्रजापती वय ४० वर्षे रा प्लॅट नं ३१, पिनाक सोसायटी, वडगांवशेरी पुणे यांचे ताब्यात किं. रु. ६.४५.३१५/- रु किंमतीचा प्रतिबंधीत तंबाखुजन्य पदार्थ व पान मसाला असा ऐवज मिळून आल्याने तो जप्त करून नमूद अटक आरोपी यांचे विरुध्द चंदननगर पोलीस स्टेशन गु.र.नं. ४०१/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १२३, २२३, २७४, २७५, सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य उत्त्पादन पुरवठा व वितरण यांचे विनीमय) अधिनियम कलम ७ (२) व २० (२) अन्न सुरक्षा मानके अधिनियम कलम २००६, चे कलम २६ (२) (i) (iv) चे उल्लंघन केल्याने कलम ५९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नमूद गुन्ह्यात जप्त केलेला मास रेकॉर्डवरील गुन्हेगार आरोपी नामे प्रेम भाटी याचा असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून त्याचा शोध सुरू आहे.
२. तसेच चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीत आनंद हाईटस सर्वे नं २२/६, सैनिकवाडी, सोपाननगर, वडगाव शेरी पुणे येथील सार्वजनिक रोडवर, इसम नामे १) विकी विजय काशीद वय २२ वर्ष रा, ए/ओ गायकवाड सावली हॉटेलचे जवळ, आव्हाळवाडी वाघोली ता, हवेली जि. पुणे मुळ पत्ता मु.पो. सावळ, ता, बारामती जि. पुणे याचे ताब्यात कि. रू. ५२,०००/-रु.कि.चा २ किलो १०० ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ मिळुन आल्याने त्यांचेविरूध्द चंदननगर पोलीस स्टेशन गु.र.नं. ४०२/२०२५ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (ब), २९, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

येरवडा पोलीस स्टेशन

१. येरवडा पोलीस स्टेशन हद्दीतील गुंजन चौक, भोला पान शॉप, मदर टेरेसा मंदिर जवळ, नगर रोड पेट्रोलपंप समोर, येरवडा पुणे या पान शॉप चा मालक व आरोपी नामे सुभाषचंन्द्र रामअवध मोर्या, वय ३४ वर्षे रा. येरवडा दर्गे वाडी, गणेश नगर गल्ली नंबर १ येरवडा पुणे मुळ गांव मुपो भुतावली, प्रतापगड, उत्तर प्रदेश याचे ताब्यात एकुण १०,११,२४०/- रु किंमतीचा प्रतिबंधक गुटखा व पान मासाला मिळून आल्याने त्याचे विरुध्द येरवडा पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ७११/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १२३, २२३, २७४, २७५, सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य उत्पादन पुरवठा व वितरण यांचे विनीमय) अधिनियम कलम ७ (२) व २० (२) अन्न सुरक्षा मानके अधिनियम कलम २००६, चे कलम २६ (२) (i) (iv) चे उल्लंघन केल्याने कलम ५९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
वरील नमुद कारवाई ही मा.पोलीस आयुक्त, श्री. अमितेश कुमार, मा. सह. पोलीस आयुक्त, श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. निखील पिंगळे, मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे.२. श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस उप निरीक्षक अस्मिता लाड, अजिम शेख, साहिल शेख, आझाद पाटील, मयुर सुर्यवंशी, संदिप जाधव, रविंद्र रोकडे, योगेश मांढरे, चेतन गायकवाड, बबनराव केदार, नितीन जगदाळे, युवराज कांबळे, शेखर खराडे, दिशा खेवलकर, साधना पवार, दिनेश बास्टेवाड मच्छिद्र धापसे, उदय राक्षे, संदिप शेळके, परेश सावंत, प्रफुल्ल मोरे यांनी केली आहे.

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!