ऑटो रिक्षांचे टायर व स्टेफनी चोरी करणा-या चोरट्यास२४ तासात केले जेरबंद


आकाश पांचाळ सह संपादक 
काळेपडळ पोलीस स्टेशन, पुणे शहर
महा पोलिस न्यूज  ! ऑनलाईन पुणे:- काळेपडळ पोलीस स्टेशन, गु.र.नं. ३९५/२०२५, भा.न्या.सं.क. ३०३ (२) मधील आरोपीचा शोध घेत असता, काळेपडळ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलीस अंमलदार प्रविण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, श्रीकृष्ण खोकले, सद्दाम तांबोळी, महादेव शिंदे, अतुल पंधरकर, शाहीद शेख, विशाल ठोंबरे, लक्ष्मण काळे व नितीन ढोले असे पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार शाहिद शेख व अतुल पंधरकर यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की, ‘एक इसम हा रिक्षामध्ये रिक्षाची टायर ठेवून लक्ष्मीपार्क येथील पालखी मार्ग, हेवन पार्ककडे जाणा-या रस्त्यालगत, गौरी हॉटेलच्या बाजुला रिक्षासह थांबलेला असुन, सदरचे टायर चोरीचे आहेत.
सदर बातमी मिळताच वरिष्ठांचे आदेशाने पोलीस स्टाफ तात्काळ सदर ठिकाणी गेले असता सदर इसमास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव-पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव शादाब युसुफ अन्सारी, वय २० वर्षे, रा. गल्ली नं. २४, सय्यदनगर, हडपसर, पुणे असे असल्याचे सांगितले. सदर आरोपीकडे अधिक तपास केला असता त्याने एकुण २,५६,०००/- रु. कि.ची दोन रिक्षा, रिक्षाचे टायर व स्टेपनी असे चोरी केल्याचे कबुल केले.
सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ५, पुणे शहर, डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, श्री.धन्यकुमार गोडसे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन श्री. मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. अमर काळंगे यांचे सुचनेप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलीस अंलदार प्रविण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, श्रीकृष्ण खोकले, विशाल ठोंबरे, शाहीद शेख, लक्ष्मण काळे, अतुल पंधरकर, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, प्रदीप बेडीस्कर व महादेव शिंदे या पथकाने केली.

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!