सोने चोरणा-या आरोपीस केले अटक ०७ गुन्हे उघडकीस आणुन त्याच्याकडुन एकुण ०७,११,०००/- रु. किं. चा मुदेमाल केला हस्तगत.
पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626
विश्रामबाग पोलीस स्टेशन, पुणे शहर,
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे:- दिनांक ०६/०९/२०२५ रोजी १०/३० वा. ते ११/३० वा.चे सुमा. बेलबाग चौक, लक्ष्मीरोड कडे जाताना डाव्या बाजुचा फुटपाथ पुणे. येथे गणपती बघायला आलेल्या गर्दीचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांचे गळ्यातील ०२ तोळे सोन्याचे साखळीचे ओवलेले रुद्राक्ष चोरुन नेले अशी फिर्याद फिर्यादी यांनी दिल्याने विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २१७/२०२५ भा.न्या.सं.क. ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर दाखल गुन्हयाचे तपासा दरम्यान पोलीस अंमलदार अर्जुन थोरात यांनी सीसीटीव्ही पाहुन संशयित आरोपी शोध घेतला असता त्यावरुन विश्रामबाग पोलीस स्टेशनचे तपास पथकातील पोलीस अंमलदार अमोल भोसले यांना गोपनीय बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा आरोपी नामे. परशा उर्फ प्रशांत शिवराम शिंदे, वय २२ वर्षे, रा. लक्ष्मीमाता मंदिर जवळ, खुळेवाडी, पुणे. याने केला आहे. सदरची बातमी मिळताच सदर आरोपीस ताब्यात घेणे कामी तपास पथकातील पोलीस अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर व पोलीस स्टाफ यांना आरोपी याचे राहते घराचा शोध घेतला. सदर आरोपी नमुद पत्यावर राहत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास ताब्यात घेतले, त्याचेकडे सदर गुन्हयाबाबत अधिक तपास केला असता आरोपीने सदर गुन्हा केल्याचे कबुल केले. तसेच सदर तपासादरम्यान विश्रामबाग पोलीस स्टेशन कडील इतर एकुण ०७ गुन्हे उघडकीस आले.
सदर आरोपी याने त्याचे घराजवळ राहणारा त्याचा साथीदार याच्याकडे सदरच्या गुन्ह्यातील मुद्देमाल दिल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्याचेकडून एकुण ०७ गुन्ह्यातील, ७०.३७ ग्रॅम वजनाचे, एकुण ७,११,०००/-रु.किं.चे सोन्याचे वेगवेगळे दागिने जप्त केले.
सदरची कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ०१, पुणे शहर, श्री. कृषीकेश रावळे, मा. सहायक पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रदिप कसबे, मा. पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. अरुण घोडके यांच्या सुचनेप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर, पोलीस अंमलदार सचिन कदम, गणेश काठे, सचिन अहिवळे, शैलेश सुर्वे, अमोल भोसले, आशिष खरात, सागर मोरे, शिवदत्त गायकवाड, अनिस शेख, अर्जुन थोरात, नितिन बाबर, राहुल माळी, महिला पोलीस अंमलदार पठारे यांनी केली.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

